फोटो सौजन्य: @SilverNShiruba/X.com
भारतीय Automobile मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बेस्ट कार ऑफर करत आहे. यात विदेशी ऑटो कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे, ज्या भारतीय ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार बेस्ट कार उपलब्ध करून देतात. अशीच एक कंपनी म्हणजे Skoda Auto.
युरोपातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या स्कोडा कंपनीने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्कृष्ट वाहने सादर केली आहेत. लवकरच ही कंपनी भारतात आणखी एक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. भारतीय मार्केटमध्ये कोणते नवीन कार कधी लाँच केली जाऊ शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
नितीन गडकरींच्या विरोधात ‘कोण’ करतंय मोहीम? E20 इंधनाबद्दल मोठे विधान करत केला गंभीर आरोप
स्कोडा लवकरच भारतीय बाजारात Octavia RS लाँच करू शकते. कंपनीची ही कार लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये आणली जाईल. कोणत्या प्रकारचे इंजिन ऑप्शन्स आणि फीचर्ससह भारतात आणता येईल याबद्दल कंपनीने ने अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु जागतिक स्तरावर ऑफर केलेल्या स्कोडा ऑक्टाव्हिया आरएसमध्ये काही बदल करून ती भारतात आणली जाऊ शकते.
कंपनीने या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. लाल रंगाच्या इन्सर्टसह पूर्ण ब्लॅक इंटीरियर आहे, ज्यामुळे ती खूप प्रीमियम दिसते. यासोबतच, यात आरएस बॅजिंगसह स्पोर्ट्स कार सीट्स आहेत. कार्बन फायबर, 13 इंच सेंट्रल डिस्प्ले, नेव्हिगेशन सिस्टम यामध्ये स्टॅंडर्ड म्हणून प्रदान केले आहे. तीन स्पोक स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह सीट्स, मेमरी फंक्शन आणि सीट कुशन, 18 आणि 19 इंच अलॉय व्हील्स, 10 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ॲल्युमिनियम फिनिश पेडल्स, एलईडी मॅट्रिक्स हेडलाइट्स, मागील एलईडी लाईट्स, तसेच अनेक उत्तम सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या फीचर्ससह, ही कार भारतात देखील लाँच केली जाऊ शकते.
Hero Splendor सह अनेक बाईक झाल्या स्वस्त; GST कमी झाल्याने जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती बचत
स्कोडा सामान्य ऑक्टाव्हियापेक्षा अधिक पॉवरफुल इंजिनसह ऑक्टाव्हिया आरएस लाँच करू शकते. अनेक मार्केटमध्ये, त्यात दोन-लिटर टीएसआय इंजिन दिले जाते. यामुळे कारला 370 न्यूटन मीटर टॉर्कसह 265 हॉर्सपॉवर मिळते. ही पॉवर याच्या जुन्या व्हर्जनपेक्षा 15 किलोवॅट जास्त आहे. यात 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन आहे. या इंजिनसह, ही कार फक्त 6.4 सेकंदात 0-100 किलोमीटरचा स्पीड गाठू शकते. याचा टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटरपर्यंत आहे. या इंजिनसह ती भारतात देखील लाँच केली जाऊ शकते.
स्कोडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नवी कार भारतात नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच होणार आहे. ही कार सीबीयू (CBU) स्वरूपात आणली जाणार असल्याने तिची विक्री मर्यादित संख्येत होण्याची शक्यता आहे.