फोटो सौजन्य: Gemini
ह्युंदाई कंपनीने त्यांची प्रीमियम हॅचबॅक कार Hyundai i20 ऑफर करते. मात्र, आता ही कार खरेदी करणे महागले आहे. चला या कारच्या नव्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
हुंडई प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आय20 विकते. उत्पादकाने अलीकडेच या कारची किंमत सुधारित केली आहे, ज्यामुळे ती खरेदी करणे सोपे झाले आहे.
निर्मात्या कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कारची एक्स-शोरूम किंमत आता 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत Era व्हेरिएंटसाठी आहे. याशिवाय Magna Executive व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 6.74 लाख रुपये असून, Magna व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हुंडईकडून i20 च्या Magna Executive व्हेरिएंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुढे व मागे स्किड प्लेट्स, शार्क फिन अँटेना, हायलाइन TPMS, ऑटो हेडलाईट्स, टेलिस्कोपिक स्टीयरिंग, की-लेस एंट्री, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM तसेच ऑडिओ आणि ब्लूटूथ कंट्रोल्स असलेले स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे.
तर Magna व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, LED DRL, रिअर एसी व्हेंट आणि स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट असे अतिरिक्त फीचर्स मिळतात.
काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले
या कारच्या बेस Era व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्स, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुढे व मागे स्किड प्लेट्स, बॉडी कलर ORVM आणि डोअर हँडल्स, टाइप-सी USB चार्जर तसेच टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे.
कंपनीने ही कार प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सादर केली असून, या सेगमेंटमध्ये या कारची टक्कर Maruti Baleno आणि Toyota Glanza यांसारख्या कार्सशी होते.






