फोटो सौजन्य: Social Media
बाईक विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन थेने फार महत्वाचे असते. त्यातही जर बाईक नवी असेल तर सुरवातीला जास्त समस्या येत नाही. पण जसजसे बाईक जुनी होऊ लागते, तसतसे तिच्यात अनेक बिघाड होऊ लागतात. यामुळे मग बाईक चालककाच्या डोक्याला सुद्धा ताप येतो. यातही जर बाईक काळा धूर मागे सोडत असेल, तर तिच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
बाईकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यास अनेक वेळा बाईकच्या सायलेन्सरमधून काळा धूर निघू लागतो. वास्तविक ही चिंतेची बाब आहे. त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास बाईकला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासोबत असे घडू नये हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला यामागील कारणे सांगणार आहोत.
जर बाईकमध्ये इंजिन इंधन आणि हवेचे योग्य मिश्रण करत नसेल तर जास्तीचे इंधन जळू लागते, ज्यामुळे काळा धूर निघतो. यावर उपाय म्हणजे कार्बोरेटर किंवा इंधन इंजेक्शन सिस्टम तपासा आणि योग्य मिक्सचरसाठी सेट करा.
SteelBird कडून Vintage Series Helmet लाँच, मिळणार अधिकची सुरक्षितता, किंमत फक्त…
एअर फिल्टर गलिच्छ किंवा ब्लॉक झाल्यास, इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही आणि इंजिनमधील इंधन योग्यरित्या जळत नाही, परिणामी काळा धूर निघतो. हवेचा योग्य प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा बदला हा यावरील उपाय आहे.
सिलिंडरमधील इंधनासोबत इंजिन ऑइल गळत असेल किंवा जळत असेल तर त्यातूनही काळा धूर निघू शकतो. पिस्टन रिंग किंवा वाल्व सील खराब झाल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पिस्टन रिंग किंवा व्हॉल्व्ह सील तपासा आणि आवश्यकतेनुसार बदला हाच यावरील उपाय आहे
जर फ्युएल इंजेक्टर नीट काम करत नसेल किंवा ब्लॉकेज असेल तर इंजिनला जास्तीचे इंधन मिळते आणि त्यातून काळा धूर निघतो. म्हणूनच इंधन इंजेक्शन सिस्टम तपासा आणि साफ करा किंवा बदला.
खराब स्पार्क प्लगमुळे इंधन नीट जळत नाही, त्यामुळे काळा धूर निघू शकतो. म्हणूनच स्पार्क प्लग नीट तपासा आणि आवश्यक असल्यास ते बदला.
जर बाईकला आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन मिळत असेल तर त्याचे पूर्ण ज्वलन होत नाही, त्यामुळे काळा धूर निघू लागतो. फ्युएल सप्लाय सिस्टम योग्यरित्या ट्यून करा जेणेकरून इंधनाची योग्य मात्रा इंजिनपर्यंत पोहोचेल.
काळा धूर तुमच्या बाईकच्या इंजिनमध्ये गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. जर तुमच्या बाईकमधून सतत काळा धूर निघत असेल तर शक्य तितक्या लवकर मेकॅनिककडून त्याची तपासणी करा. हे आपल्याला मोठे नुकसान आणि महाग दुरुस्ती टाळण्यास मदत करू शकते.