या लेखामध्ये टॉप विंटेज बाइक्सचा मराठीमध्ये उल्लेख आहे, ज्यांनी बाईकप्रेमींना आजपर्यंत मोहित करत आले आहे. या बाइक्स त्यांचे शक्तिशाली इंजिन, क्लासिक डिझाइन, आणि परफॉरमन्समुळे अजूनही इतिहासात त्यांनी विशेष स्थान राखिले आहेत. प्रत्येक पिढीतील तरुणांना या बाईकने वेड लावले आहे जर तुम्ही देखील बाईक प्रेमी आहात तर तुम्हाला देखील या बाईकचे नक्कीच वेड असेल.
'या' आहेत तरुणांना मोहात टाकणाऱ्या विंटेज बाईक्स. (फोटो सौजन्य - Social Media)
भारतीय बाजारात विशेष ओळख असलेली रॉयल एनफिल्ड बुलेट ही जगातील सर्वात जुन्या बाइक्सपैकी एक आहे. तिचे क्लासिक लुक्स आणि टिकाऊपणा आजही तितकेच आकर्षक आहेत.
80च्या दशकात लोकप्रिय असलेली यामाहा आरएक्स 100 ही बाईक हलकी व जलद होती, ज्यामुळे ती युवा पिढीत खूप प्रसिद्ध झाली. यामाहा आरएक्स 100 आजही जुन्या बाइकप्रेमींच्या पसंतीत आहे.
जावा सीझर 250 ही 60-70च्या दशकातील एक लोकप्रिय बाइक होती. तिचा आवाज आणि डिझाइन बाइकप्रेमींसाठी एक आदर्श बनला. आजही या बाइकला संग्रहणीय मानले जाते.
ब्रिटिश मोटरसायकल कंपनी बीएसएची बीएसए गोल्ड स्टार ही बाइक एक शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट डिझाइनसह येते. ही बाइक रेसिंगसाठीही ओळखली जात असे.
70च्या दशकात होंडा सीबी 750ने मोटरसायकल उद्योगात क्रांती आणली होती. तिचे फोर-सिलेंडर इंजिन आणि स्पीडला बाईकप्रेमींनी खूप पसंती दिली होती.