नवीन कमर्शियल ट्रक म्हणून Tata LPT 812 लाँच
भारतामधील सर्वात मोठी वाहन उत्पादक टाटा मोटर्स यांनी मीडियम कमर्शियल व्हेईकल्स श्रेणीत नवीन ट्रक टाटा LPT 812 लॉंच केला आहे. ऑपरेशनल कार्यक्षमतेत व मालकी हक्क खर्चात नवे मापदंड निर्माण करत हा ट्रक ताफा मालकांसाठी अधिक नफा व उत्पादनक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
फॅक्टरी-फिटेड एअर कंडिशनिंगसह सज्ज असलेला LPT 812 हा भारतातील पहिला 5-टन प्रमाणित पेलोडसह 4-टायर ट्रक ठरला आहे. हा ट्रक शहरांमधील मालवाहतूक अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवतो. टाटा मोटर्सच्या विश्वासार्ह LPT प्लॅटफॉर्मवर विकसित झालेला हा ट्रक 6 टायर ट्रकची मजबूती आणि 4 टायर वाहनाची गतिशीलता व कमी देखभाल खर्च एकत्रित करून ग्राहकांना उत्कृष्ट समाधान देतो. विविध लोड बॉडी पर्यायांसह हा ट्रक औद्योगिक माल, एफअँडव्ही, बाजारपेठेतील वस्तू, कूरिअर अशा विविध प्रकारच्या मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल.
लॉंचप्रसंगी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसायप्रमुख राजेश कौल म्हणाले, “टाटा LPT 812 श्रेणीमध्ये ग्राहकांच्या नफ्यासाठी नवे मानदंड तयार करतो. वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा ट्रक सुधारित उत्पादकता, उच्च इंधन कार्यक्षमता, सहज ड्रायव्हिंग अनुभव आणि जास्तीत जास्त अपटाइम प्रदान करतो.”
टाटा LPT 812 मध्ये विश्वसनीय 4SPCR डिझेल इंजिन असून ते 125hp पॉवर आणि 360Nm टॉर्क निर्माण करते. यामुळे उत्कृष्ट परफॉर्मन्ससोबत उच्च इंधन कार्यक्षमता सुनिश्चित होते. 5-स्पीड गिअरबॉक्स आणि बूस्टर-असिस्टेड क्लच मुळे गिअरशिफ्ट सहज होत असून ड्रायव्हरला थकवा कमी येतो. सुरक्षिततेसाठी सुधारित ब्रेकिंग सिस्टम, हेवी-ड्युटी रॅडियल टायर्स, तसेच पॅराबोलिक फ्रंट सस्पेंशन, अँटी-रोल बार, फुल एस-कॅम एअर ब्रेक्स आणि टिल्ट-टेलिस्कोपिक पॉवर स्टीअरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक सुरक्षित व आरामदायी ठरतो. 3 वर्षे / 3 लाख किमी वॉरंटीच्या पाठबळासह LPT 812 ग्राहकांना दीर्घकालीन विश्वासार्हता, समाधान व उत्कृष्ट मूल्य प्रदान करतो.
अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स
टाटा मोटर्सकडे 4 ते 19 टन GVW ILMCV श्रेणीत उत्पादने आहेत. ही वाहने कणखर डिझाइनसह विकसित केली जातात आणि विविध अनुप्रयोगांसाठी कठोर टेस्टिंगमधून तयार केली जातात. कंपनीच्या संपूर्ण सेवा 2.0 उपक्रमांमुळे ग्राहकांना संपूर्ण वाहन जीवनचक्र व्यवस्थापन व मूल्यवर्धित सेवा मिळतात. तसेच Fleet Edge डिजिटल सोल्युशन मुळे ताफा मालकांना वाहनाचा अपटाइम वाढवणे आणि मालकी हक्क खर्च कमी करणे शक्य होते.
भारतभरातील 3200 हून अधिक टचपॉइंट्सच्या विशाल सेवा नेटवर्कमुळे, टाटा मोटर्स 24×7 समर्थनासह आपल्या ग्राहकांना सर्वोच्च अपटाइम आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करते.