फोटो सौजन्य: Freepik
भारतीय मार्केटमध्ये मिड-साइज SUVs ला चांगलीच मागणी असते. याचमुळे अनेक कार निर्मात्या कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम एसयूव्ही लाँच करत असतात. यात Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Highrider आणि Kia Seltos सारख्या SUV सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.
लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक कार कंपनी आपल्या ग्राहकांसाठी विशेष कार्स लाँच करत आहे. जर तुम्ही सुद्धा या सणासुदीत एसयूव्ही घेण्याच्या विचार करत आहात. तर लवकरच तीन दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये दाखल होणार आहे. जाणून घेऊया या कार्सबद्दल.
Tata Curve चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट भारतात ७ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले आहे. याच कारचा ICE व्हेरिएंट 2 सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. आगामी Tata Curve मध्ये तुम्हाला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन, 1.2 लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन पॉवरट्रेन म्हणून दिले जाऊ शकते.
हे इंजिन 123 bhp ची कमाल पॉवर आणि 225 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय असू शकतो.
हे देखील वाचा: Paris Olympics 2024 मध्ये भारतचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना मिळणार MG Electric Car
ह्युंदाई क्रेटानंतर आता कंपनी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही अल्काझारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,या अपडेटेड कारमध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञानासह 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कार प्ले कनेक्टिव्हिटी (Android आणि Apple), डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल अशी फीचर्स दिली जातील.
कार निर्माता कंपनी MG Motors लवकरच भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार Windsor EV लाँच करणार आहे. माहितीनुसार, आगामी विंडसर ईव्हीमध्ये ग्राहकांना 2 बॅटरी पॅक पर्याय मिळणार आहेत. मात्र, आगामी इलेक्ट्रिक कारची ड्रायव्हिंग रेंज अद्याप सांगण्यात आलेली नाही. ही कारसुद्धा लवकरच लाँच केली जाऊ शकते.