हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
गेल्या १७ वर्षांपासून चालत आलेला एक गैरसमज आहे जो मोडण्याची क्षमता सूर्यकुमार यादवकडे आहे. अलिकडच्या काळात भारताने या फॉरमॅटमध्ये आपली क्षमात सिद्ध केली आहे. स्फोटक फलंदाज आणि गोलंदाजांच्या संघासह, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा गैरसमज मोडण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्पर्धेच्या जवळजवळ १९ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही संघ विजेतेपद राखण्यास यशस्वी ठरला नाही किंवा कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकता आलेला नाही.
आयसीसीकडून टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता रोहित शर्मावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. यावेळी, टी-२० विश्वचषकाची १० वी आवृत्ती ७ फेब्रुवारी २०२६ पासून खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेत अंतिम सामन्यासह ५५ सामने खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने यापूर्वी २०१२ मध्ये या स्पर्धेचे शेवटचे आयोजन केले होते.






