फोटो सौजन्य: Social Media
भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी जोर धरू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाची वाढती किंमत. त्यामुळेच आता एक पर्यावरणपूरक पूरक कार म्हणून इलेक्ट्रिक कार्सकडे पहिले जात आहे. भारतात अनेक स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्स ऑफर करत आहे. यातही सर्वात जास्त मागणी ही MG Windsor EV ला आहे.
एमजी विंडसर ईव्ही ही सध्या भारतात सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. ही एमजी मोटरची सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही असून त्याची एक्स-शोरूम किंमत 14 लाखांपासून सुरू होते. मात्र, जर तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करायची असेल, तर तुम्ही फायनान्स ऑप्शन्सचा लाभ घेऊ शकता, जसे की ईएमआय आणि डाउन पेमेंट.
सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांनाही ही कार सहज परवडू शकते, विशेषतः जर तुमचा महिन्याचा पगार 40000 ते 50000 च्या दरम्यान असेल. चला या कारची ऑन-रोड किंमत, आणि ईएमआयच्या डिटेल्सबद्दल जाणून घेऊया.
Tata Curvv चा CNG व्हेरियंट मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार, टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
नवी दिल्लीमध्ये या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 14.75 लाख आहे. यामध्ये आरटीओ चार्जेस, विमा आणि इतर आवश्यक खर्च समाविष्ट आहेत. जर तुम्ही 2 लाखांचे डाउन पेमेंट केले, तर उर्वरित 12.75 लाखांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागेल. हे कर्ज 8.5% वार्षिक व्याजदराने 7 वर्षांसाठी (८४ महिने) घेतल्यास, दरमहा सुमारे 20,000 इतका ईएमआय बसेल. संपूर्ण लोनच्या कालावधीत, एकूण 17 लाख व्याजासह बँकेला परत करावे लागतील. त्यामुळे कारची एकूण किंमत सुमारे 19 लाखांपर्यंत जाते. लक्षात घ्या, ईएमआय आणि एकूण पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअर, शहर आणि बँकेच्या अटींवर अवलंबून असते.
परवडणाऱ्या दरात प्रगत फीचर्स आणि उत्तम सुरक्षा देणारी ही इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी एक हुशार पर्याय ठरते. या कारमध्ये १५.६-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ८.८-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, पॉवर्ड टेलगेट आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत.
जागतिक मार्केटमध्ये Hydrogen Car ची एंट्री, मिळणार 700 किमी पर्यंतची रेंज
ही कार सुरक्षिततेच्या बाबतीतही आघाडीवर आहे. यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिली आहेत. त्यामुळे ही कार फक्त स्टायलिश आणि परवडणारीच नाही, तर कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि चांगली निवड ठरते.