फोटो सौजन्य: @carandbike/X.com
भारतीय ऑटो बाजारात Tata Motors चा एक वेगळाच दबदबा पाहायला मिळतो. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. त्यामुळेच तर ग्राहक देखील कार खरेदी करताना नेहमीच टाटाच्या कार्सना पहिले प्राधान्य देत असतात. अशातच आता टाटा नवीन एसयूव्ही आणण्याच्या तयारीत दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टाटा मोटर्स त्यांच्या नवीन एसयूव्ही, Tata Sierra लाँच करण्याची तयारी करत आहे. 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये ती पहिल्यांदा कोसेप्ट स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेतील सर्वात अपेक्षित कारपैकी एक आहे. आता, ही एसयूव्ही 25 नोव्हेंबर रोजी पूर्णपणे नवीन आणि आधुनिक अवतारात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
TVS नवीन मॅक्सी Electric Scooter आणण्याच्या तयारीत, मिळणार 150 किमीची रेंज
सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन टाटा सिएराचे डिझाइन भारतीय ग्राहकांना मूळ टाटा सिएराची आठवण करून देईल, जी 1991 ते 2003 दरम्यान भारतीय रस्त्यांवरील लोकप्रिय एसयूव्ही होती. कंपनीच्या मते, ICE सिएरा पहिल्यांदा 25 नोव्हेंबर रोजी लाँच केली जाईल, तर त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन थोड्या वेळानंतर नंतर लाँच केली जाईल.
नवी Tata Sierra आपली आयकॉनिक डिझाईन फिलॉसॉफी घेऊन परत येत आहे. या SUV मध्ये जुन्या मॉडेलची ओळख असलेली Alpine विंडो पुन्हा पाहायला मिळेल. टाटाने जुन्या मॉडेलच्या क्लासिक डिझाईनला आधुनिक स्टाइलिंगसह एकत्र आणत या SUV ला आणखी आकर्षक रूप दिले आहे. यात LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED फॉग लॅम्प्स, LED डे-टाईम रनिंग लाईट्स (DRLs), LED टेललॅम्प्स, फंक्शनल रूफ रेल्स आणि स्पोर्टी 19-इंच अलॉय व्हील्स असे आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
नवी Tata Sierra एक प्रीमियम SUV म्हणून सादर केली जाणार आहे. बदलत्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने यामध्ये अनेक हाय-टेक आणि लग्झरी फीचर्स दिले आहेत. यात लेव्हल 2 ADAS सूट, 360-डिग्री सराउंड व्यू कॅमेरा आणि इतर अत्याधुनिक फीचर्स मिळतील, ज्यामुळे ही SUV आपल्या सेगमेंटमधील सर्वात मॉर्डन कार्सपैकी एक ठरेल.
Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा
नवीन Tata Sierra ला तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये लाँच करण्यात येईल, पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जन. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये कंपनीचा नवीन 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन असेल, जो प्रथम 2023 Auto Expo मध्ये दाखवण्यात आला होता. एंट्री-लेव्हल व्हेरिएंट्समध्ये याच इंजिनचा नेचुरली ॲस्पिरेटेड (NA) व्हर्जन दिला जाऊ शकतो. तर डिझेल मॉडेलमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळेल, जो सध्या Tata Curvv मध्ये वापरला जातो.
नवी Tata Sierra SUV ची किंमत (एक्स-शोरूम) सुमारे ₹12 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ती मिड-साइज SUV सेगमेंट मध्ये उतरेल, जिथे तिची स्पर्धा Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Honda Elevate, आणि Kia Seltos सारख्या लोकप्रिय SUV मॉडेल्सशी होईल.






