फोटो सौजन्य: @evshifters/ X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी बेस्ट बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम रेंज आणि फीचर्स ऑफर करणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाक्या ऑफर करत आहे. लवकरच TVS देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याच्या तयारीत दिसत आहे.
TVS मोटर कंपनी आपल्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच कंपनीने 2026 TVS M1-S इलेक्ट्रिक स्कूटरचा एक अपडेटेड टीझर जारी केला आहे, जो येत्या EICMA 2025 शोमध्ये सादर केला जाणार आहे. ही स्कूटर प्रामुख्याने युरोपियन बाजारपेठ लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे, मात्र, भारतातही याच्या लाँचची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर पाहूया, या Electric Scooter मध्ये कोणती खास फीचर्स असतील?
MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?
2026 TVS M1-S इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम, यात नवीन LED DRL सिग्नेचर देण्यात आली आहे, जी प्रोजेक्टर हेडलाइटच्या आजूबाजूला पसरलेली आहे. ही DRL आधीच्या तुलनेत अधिक कव्हरेज देते, ज्यामुळे स्कूटरचा फ्रंट फेसिया अधिक स्टायलिश दिसतो. याशिवाय, स्कूटरच्या फ्रंट फेशियामध्ये ड्युअल-टोन अपील जोडण्यात आली आहे, ज्यामुळे तिचा लूक आणखी आकर्षक झाला आहे.
त्याचप्रमाणे, लांब विंडस्क्रीन पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. स्कूटरमध्ये फ्लॅट फ्लोअरबोर्ड, सिंगल-पीस स्टेप्ड सीट, स्टायलिश सिंगल-पीस रियर ग्रॅब रेल, आणि LED टेललाइट्स सारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील दिली गेली आहेत.
श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!
2026 TVS M1-S मध्ये 14-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये रुंद टायर्स बसवलेले आहेत. याशिवाय, स्कूटरच्या दोन्ही व्हील्समध्ये डिस्क ब्रेक्स दिले असून, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि रिअर ट्विन शॉकर सस्पेन्शनचा सेटअप देण्यात आला आहे.
स्कूटरमध्ये 7-इंच TFT क्लस्टर, स्मार्ट की फीचर, आणि 26 लिटर अंडर-सीट स्टोरेज यांसारखी आधुनिक व स्मार्ट फीचर्स दिली गेली आहेत. या स्कूटरचे एकूण वजन 152 किलोग्रॅम असून याचा व्हीलबेस 1,350 मिमी आहे, ज्यामुळे लांब अंतरावर स्थिर आणि आरामदायी रायडिंग अनुभव मिळतो.
2026 TVS M1-S मध्ये 4.3 kWh बॅटरी पॅक दिला जाणार आहे. ही बॅटरी 12.5 kW ची पॉवर आणि 254 Nm रिअर व्हील टॉर्क तसेच 45 Nm रेटेड टॉर्क निर्माण करेल. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या स्कूटरची रेंज सुमारे 150 किमी पर्यंत जाऊ शकते.
जरी कंपनीने ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच केली जाणार का, हे अद्याप स्पष्ट केलेले नसले तरीही ती युरोपियन बाजारपेठेत आपली मजबूत उपस्थिती निर्माण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.






