फोटो सौजन्य: Gemini
30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा
टाटा Sierra रेट्रो डिझाइनसोबत मॉडर्न फीचर्स घेऊन मार्केटमध्ये आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये इतकी आहे. इतर व्हेरिएंट्सच्या किंमती अद्याप कंपनीकडून जाहीर झालेल्या नाहीत.
Hyundai Creta ही एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपये पासून 20.20 लाख रुपयेपर्यंत जाते. Kia Seltos ही याच प्राइस-रेंजमध्ये येते व तिची एक्स-शोरूम किंमत 10.79 लाख रुपये पासून 19.81 लाख रुपयेपर्यंत आहे.
टाटा Sierra ही Hyundai Creta पेक्षा लांब SUV आहे; पण या तिन्हींपैकी Kia Seltos सर्वात मोठी आहे. Sierra ही सेगमेंटमधील सर्वांत रुंद आणि सर्वांत उंच कार आहे. या SUV मध्ये सर्वात जास्त व्हीलबेस मिळतो, त्यामुळे केबिन स्पेसही इतरांपेक्षा जास्त वाटते. जिथे सामान्यत: 400-500 लीटर बूट स्पेस मिळतो, तिथे टाटा Sierra मध्ये तब्बल 622 लीटर बूट स्पेस दिला आहे.
टाटा Sierra, Hyundai Creta आणि Kia Seltos यांच्यात तुलना केली तर Sierra स्पेसच्या बाबतीत स्पष्टपणे आघाडीवर आहे. तिचा बूट स्पेस तिला सेगमेंटमध्ये टॉपवर नेतो. मात्र Creta आणि Seltos यांनी गेल्या अनेक वर्षांत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. तसेच, टाटावरही लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे स्पर्धा अधिकच रंगणार आहे.






