फोटो सौजन्य- iStock
बाईक ट्रिपची आवड अनेकांना असते. ग्रुपने बाईक रायडिंगसाठी लडाख पासून ते लोणावळापर्यंत रायडर जात असतात. रायडर्स व्यतिरिक्तही अनेकदा काहीजण पण वर्षातून एकदा बाईक रायडिंग करतात. बाईक ट्रिपसाठी लोकप्रिय जागा निश्चितच आहे मात्र त्याच ठिकाणी बाईक ट्रिप करावी असा नियम नक्कीच नाही. काहीजण आपल्या गावी बाईक रायडिंग करत जातात तर काही जण शहरातून दूर शांत असलेल्या स्थळावर जाता. बाईक ट्रिप्स ही तुम्हाला आनंद देते तसेच तुम्हाला चांगली अनुभूती देते ज्यामुळे त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.
याच बाइक ट्रिपला मजेदार आणि सुरक्षित करण्यासाठी, काही गॅझेट्स तुमच्यासोबत घेऊन जाणे खूप फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे तुमच्या पुढच्या बाईक ट्रिपला तुम्ही अविस्मरणीय बनवू शकता जाणून घेऊया अशा 5 महत्त्वाच्या गॅझेट्सबद्दल
बाइक फोन माउंट: हे गॅझेट तुम्हाला तुमचा फोन बाइकच्या हँडलबारवर सुरक्षितपणे माउंट करण्यात मदत करते. याच्या मदतीने तुम्ही जीपीएस नेव्हिगेशन वापरू शकता. या बाईक फोन माउंटमुळे प्रवास करताना पुन्हा पुन्हा फोन काढण्याची गरज भासणार नाही.
पोर्टेबल चार्जर (पॉवर बँक): लांबच्या प्रवासात तुमचा फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करून ठेवणे उपयुक्त असते. त्यामुळे क्षमतेची पॉवर बँक तुमच्या गॅझेटची बॅटरी संपण्यापासून रोखू शकते, तुम्हाला नेहमी कनेक्ट केलेले आणि सुरक्षित ठेवते.
ॲक्शन कॅमेरा: बाइकिंग ट्रिपच्या रोमांचक आठवणी टिपण्यासाठी ॲक्शन कॅमेरे हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही ते तुमच्या हेल्मेट किंवा बाइकवर लावू शकता आणि संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. त्यानंतर त्याचा व्लोगही बनवू शकता. ज्या द्वारे तुमची बाईक ट्रिपच्या आठवणी सदैव जपता येतील.
ब्लूटूथ हेल्मेट इंटरकॉम: जर तुम्ही मित्रांच्या ग्रुपसह प्रवास करत असाल, तर ब्लूटूथ इंटरकॉम तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय बोलू देते. हे हेल्मेटमध्ये बसते आणि बाईक चालवताना सुरक्षितपणे संवाद साधण्यास मदत करते.
टायर इन्फ्लेटर आणि पंक्चर रिपेअर किट: लांबच्या प्रवासात टायर पंक्चर होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. यासाठी कॉम्पॅक्ट टायर इन्फ्लेटर आणि पंक्चर रिपेअर किट तुम्हाला कठीण काळात मदत करू शकतात आणि तुम्हाला कुठेही अडकून पडण्यापासून वाचवू शकतात.
या गॅझेट्समुळे तुमची बाईक ट्रिप अधिक मजेदार आणि संस्मरणीयही आणि सुरक्षित होईल.