फोटो सौजन्य: Freepik
हल्ली अनेक जण आपली कार अपग्रेड करताना दिसतात. यात विशेष करून तरुणांची संख्या जास्त आहे. कार अपग्रेड करताना त्याचे गिअर्स, लूक आणि सर्व बाबींकडे लक्ष दिले जाते. पण जेव्हा विषय कारचचे व्हील्स बदलण्याचा होतो तेव्हा अनेक जण नेमका चांगला अलॉय व्हील कसा निवडावा याबाबत गोंधळून जातात.
काय असतात अलॉय व्हील्स?
अलॉय व्हील्स हे मिश्रधातूची चाके आहेत जे सामान्यतः धातू आणि इतर सामग्रीच्या मिश्रणापासून बनविली जातात. हे सामान्यतः स्टीलच्या चाकांपेक्षा मजबूत आणि हलके असतात. ज्यामुळे अलॉय व्हील्स वापरणे एक चांगला पर्याय मानला जातो. बरेच लोक कारची विजबिलिटी वाढवण्यासाठी अलॉय व्हील्स लावतात. कारची स्टेबिलिटी आणि इंधन कार्यक्षमता वाढविण्यात अलॉय व्हील्स चांगली भूमिका बजावतात.
अलॉय व्हील्सचे प्रकार
वेगवेगळ्या सामग्रीपासून वेगवेगळे मिश्रधातू तयार होतात, ज्याचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात. कारचालकाला प्रत्येक अलॉय व्हील्सचा एक वेगळा अनुभव येऊ शकतो. अलॉय व्हील्सचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. जे खाली नमूद केले आहे.
अलॉय व्हील्सचा फायदा आणि नुकसान
अलॉय व्हील्स अनेक वैशिष्ट्यांसह येतात. स्टीलच्या चाकांपेक्षा अलॉय व्हील्स अधिक टिकाऊ असतात. हे डिस्क ब्रेकला चांगले वेंटिलेशन आणि एयर सर्कुलेशन देण्यास मदत करतात. त्याच वेळी, ते सामान्य स्टीलच्या चाकांपेक्षा अधिक महाग आहेत. याशिवाय, त्यांची दुरुस्ती करणे कठीण आहे आणि अलॉय व्हील वाहनांमध्ये राइडच्या क्वालिटीत सुद्धा तडजोड होते. यामुळे जर तुम्ही तुमची कार अपग्रेड करायची ठरवली असेल तर नक्कीच तुमच्या मेकॅनिकला विचारून तुमच्या कारच्या चाकांमध्ये बद्दल करा.