फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार, पंचकाचा कालावधी हा 5 दिवसांचा असतो. यावेळी चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमधून जातो. असे मानले जाते की या नक्षत्रांमध्ये तीव्र आणि अस्थिर ऊर्जा असते, ते पंचक अशुभ मानले जाते. पंचकदरम्यान दरम्यान कोणतेही शुभ कामे केली जात नाही. यावेळी काही कार्य करण्यास निषिद्ध मानले जाते. पंचक दर महिन्याला 5 दिवस असते. आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी सुरू होणाऱ्या पंचकला वेगवेगळी नावे आहेत. यावेळी सप्टेंबर महिन्यात पचंक कधी सुरु होत आहे, काय होणार आहेत परिणाम आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
पंचांगानुसार, पंचकाची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होत आहे आणि त्याची समाप्ती बुधवार, 10 ऑगस्ट रोजी आहे. पंचक दरम्यान, दक्षिण दिशेला प्रवास करणे, नवीन काम सुरू करणे, घराचे छप्पर बांधणे किंवा लाकडाशी संबंधित कोणतेही काम करणे टाळावे. कारण ही काम करण्यासाठी हा काळ अशुभ मानला जातो.
पंचकांची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11.21 वाजल्यापासून होईल. या दिवशी अनंत चतुर्दशी देखील आहे आणि पंचकांची समाप्ती बुधवार, 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.3 मिनिटांनी होईल.
सप्टेंबरमध्ये शनिवारपासून पंचकाची सुरुवात होत आहे. म्हणून याला मृत्यूपंचक असे म्हणतात. शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकात अशुभ परिणामांचा प्रभाव पाच पटीने वाढतो, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मृत्युपंचक हा सर्वात अशुभ आणि वेदनादायक मानला जातो.
मृत्युपंचकादरम्यान शारीरिक आणि मानसिक वेदना टाळण्यासाठी धोकादायक कामे करणे टाळावे.
मृत्युपंचकादरम्यान कोणत्याही नवीन कामाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळावे.
मृत्यूपंचकादरम्यान प्रवास करणे टाळावे, कारण त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.
शिवलिंगावर पाणी अर्पण करुन शिव चालिसेचे पठण करावे.
मृत्युपंचकादरम्यान हनुमान चालिसाचे पठण करावे आणि मंदिरात दिवा लावा.
मृत्युपंचकात शनिवारी छाया दान करावे.
मृत्युपंचकात भैरवबाबांची पूजा करणेदेखील शुभ मानले जाते.
मृत्युपंचकात काळे वस्त्र, काळे तीळ, काळे उडीद इत्यादी गोष्टींचे दान करावे.
मृत्युपंचकात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने अपघातापासून बचाव होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)