गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. त्वचा कायमच मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण हात आणि पायांवर त्वचेकडे जास्त लक्ष दिले जात नाही. गुडघे आणि हातांचे कोपरे काळे होऊन जातात. शरीरावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचेवर डेड स्किन मोठ्या प्रमाणावर जमा होते. ज्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. काहीवेळा खाज येणे, लाल रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हातांच्या कोपऱ्यांवर वाढलेला काळेपणा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा वाढू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा भेंडीच्या पाण्याचा वापर, केस होतील मऊ
सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. डेड स्किन जमा झाल्यानंतर हातांचे कोपरे किंवा गुडघे खूप जास्त काळे दिसू लागतात. काळेपणा वाढल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचा आतून स्वच्छ करतात आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होते.
डेड स्किन कमी करण्यासाठी टोमॅटो, कॉफी, तांदळाचे पीठ, दही आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात कॉफी पावडर, दही आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांवर लावून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास त्वचेवर वाढलेले टॅनिंग पूर्णपणे कमी होईल.
त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. यामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पेक्टिन गुणधर्म त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी टोमॅटो अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय यामध्ये असलेले अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म त्वचेवरील डेड स्किन कमी करून त्वचा उजळदार करतात.