फोटो सौजन्य: iStock
हिवाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे. या थंड हवेत अनेक जणांचे फिरायचे प्लॅन्स बनत असतात. माळशेज घाट, माथेरान, आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते. यात जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर मित्रमंडळी फिरण्यासाठी तयारच असते.
हल्ली अनके जण लॉंग ट्रिपसाठी बाईकव्यतिरिक्त स्कूटर सुद्धा वापरताना दिसतात. सध्या अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज मार्केटमध्ये अशा स्कूटर आणत आहेत ज्या बाईकच्या तोडीस तोड देणाऱ्या आहेत. त्यामुळेच स्कूटर सुद्धा लॉंग ट्रीपसाठी एक बेस्ट ऑप्शन मानले जातात. याव्यतिरिक्त स्कूटर शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
स्कूटर वापरताना अनेक समस्या उद्भवत असतात. त्यातही जर हिवाळा असेल तर स्कूटर स्टार्ट होण्यास अनेक व्यत्यय येत असतात. हिवाळा आला की अनेक समस्या येतात. त्यातील एक म्हणजे सकाळी स्कूटर सुरू करणे.
Royal Enfield ची अजून एक बाईक मार्केटमध्ये हवा करण्यास सज्ज, जाणून घ्या किंमत
स्कूटर सुरू करण्यासाठी अनेकदा मेकॅनिकची मदत घ्यावी लागते. हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची स्कूटर सहज सुरू करू शकता. ही पद्धत दुसरी कोणतीही नसून चोकपासून स्कूटी सुरू करणे अशी आहे. जर तुमची स्कूटी कडाक्याच्या थंडीत सुरू होत नसेल तर तुम्ही चोकच्या मदतीने ती सुरू करू शकता. हिवाळ्यात चोकच्या मदतीने स्कूटर कशी सुरू करायची ते जाणून घेऊया.
थंडीच्या मोसमात स्कूटरचे इंजिन ऑइल थंडीमुळे घट्ट होऊन जाते. त्यामुळे इंधन व्यवस्थित मिसळत नाही आणि इंजिन सुरू करणे कठीण होऊन बसते. यामुळेच हिवाळ्यात अनेक वेळा सेल्फ स्टार्ट किंवा किक मारूनही स्कूटर लवकर सुरू होत नाही.
मोटरसायकल आणि स्कूटरमध्ये चोक दिले जाते. ही एक पद्धत आहे ज्याद्वारे इंजिनमधील इंधन आणि हवेचे मिश्रण नियंत्रित केले जाते. हिवाळ्यात, जेव्हा इंजिन थंड असते तेव्हा चोक दिल्याने जास्त इंधन इंजिनमध्ये जाते आणि हवा कमी होते. इंधन आणि हवा यांचे मिश्रण घट्ट होते आणि मग इंजिन सहज सुरू होते.