फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कंपनीज नवनवीन कार्स लाँच करीत आहे. यातही इलेक्ट्रिक कार्सची संख्या जास्त आहे. एकीकडे या नवीन कार्सला भारतीय ग्राहकांकडून चांगलीच मागणी मिळत आहे तर दुसरीकडे कित्येक जण आजही सेकंड हॅन्ड कार विकत घेत असतात. सेकंड हॅन्ड कार घेण्याचे अनेक फायदे अनेक आहेत. यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे पैश्यांची बचत.
आज अनके असेही कार मालक आहे ज्यांना आपली कार विकायची आहे. परंतु आपल्या कारला चांगली किंमत मिळेल कि नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. जर तुम्हला सुद्धा तुमची कार विकायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही तुमची जुनी कार विकण्याचा विचार करत असाल आणि चांगली किंमत मिळवू इच्छित असाल तर तुमच्या कारमधील काही महत्त्वाचे बदल आणि सुधारणा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
हे देखील वाचा: Hyundai बनवतेय इलेक्ट्रिक कार, चक्क सिंगल चार्जमध्ये देणार 900 किलोमीटरची रेंज
कारवर स्क्रॅच किंवा फिडिंग असल्यास, तुम्ही पेंटचे काम पूर्ण करू शकता. कारच्या बॉडीवर किरकोळ डेंट्स आणि स्क्रॅच दुरुस्त करा, जेणेकरून तुमची कार नवीन दिसेल. हेडलाइट्स किंवा टेललाइट्स निस्तेज असल्यास, ते बदला किंवा पॉलिश करा.
कारच्या आतील भाग चंगळ स्वच्छ करा. यामध्ये सीट कव्हर्स, डॅशबोर्ड आणि फ्लोअर मॅट्स समाविष्ट आहेत.
कारचे सीट कव्हर जुने किंवा फाटलेले असल्यास, ते बदला किंवा त्याजागी नवीन सीट लावून घ्या. एसी आणि ऑडिओ सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा.
इंजिनची कार्यक्षमता तपासा आणि आवश्यक असल्यास, ते ट्यून अप करा. तसेच कारच्या ब्रेक आणि टायर्सची स्थिती तपासा. जर टायर खराब झाले असतील तर ते पहिले बदला. कारचे सर्व्हिस रेकॉर्ड अचूक ठेवा जे तुम्ही कार खरेदीदाराला दाखवू शकता.
तुमच्या कारमध्ये बेसिक ऑडिओ सिस्टम असल्यास, तुम्ही ती टचस्क्रीन आणि आधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टमसह अपग्रेड करू शकता. ग्राहकाच्या सुरक्षेसाठी कारमध्ये मागील कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स सारखे फीचर्स जोडा.
आरसी, विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि सेवा रेकॉर्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. आरटीओ ट्रांसफर आणि इतर कागदपत्रे आधीच तयारी करून ठेवा.
या बदलांसह, तुमच्या कारची स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला ती विकताना चांगली किंमत मिळू शकेल.