फोटो सौजन्य: YouTube
फक्त देशभरात नाही तर जगभरात इलेक्ट्रिक कार्सचा डंका वाजत आहे. येणार काळ हा इलेक्ट्रिक कार्सचा असल्यामुळे अनेक कार निर्मात्या कंपनीज विविध फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कार्स मार्केटमध्ये आणायच्या तयारीत आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीमुळे अनेक कार खरेदीदार इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देत आहेत. यातच आता ह्युंदाई ही भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी लवकरच इलेक्टिक कार सेगमेंट आपले पाय रोवण्यास सज्ज होत आहे.
अनेक कार उत्पादक कंपनीज भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेल कार तसेच इलेक्ट्रिक कारचे प्रकार लाँच करत आहेत. ह्युंदाई कंपनीसुद्धा या शर्यतीत मागे नाही. आता Hyundai Motor ने आपले लक्ष इलेक्ट्रिक कारवर केंद्रित केले आहे. यासोबतच कंपनी आपल्या कार्सना हायब्रीड मोडमध्ये आणण्याच्या तयारीत सुद्धा दिसत आहे.
हे देखील वाचा: तुमच्या कारमधील ‘हा’ भन्नाट फिचर बनवेल तुमच्या प्रवासाला अधिकच सोपा
Hyundai Motor ने कंपनीच्या आगामी वर्षांच्या योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. 2030 पर्यंत 5.55 मिलियन कार्स विकण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या 5.55 मिलियन कारमध्ये 2 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे ऑटोमेकर्सचे उद्दिष्ट आहे.
Hyundai Motor नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 900 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते असा अंदाज आहे. 2030 पर्यंत 21 इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कार्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची किंमत कमी करण्यावरही कंपनी लक्ष देत आहे. जेणेकरून या कार्स सर्वसामान्याना सुद्धा परवडतील.
Hyundai Motor भारतात SUV सोबत इलेक्ट्रिक मॉडेल सुद्धा आणणार आहे. Kona आणि Ioniq 5 नंतर कंपनी भारतीय बाजारात पहिली मास मार्केट EV आणणार आहे. Creta EV ही Hyundai ची सर्वात मोठी लाँचिंग कार असू शकते. Creta EV व्यतिरिक्त, इतर अनेक नवीन मॉडेल्स भारतीय कार मार्केटमध्ये दिसू शकतात.
असा अंदाज आहे की Creta EV चे उत्पादन या वर्षी सुरू होऊ शकते. ही इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते. Hyundai अशा ईव्हीवर काम करत आहे, जेणेकरून लोकांना या कार्स चार्ज करताना कमी कष्ट घ्यावे लागेल.