फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची बाईक असावी हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु एकदा का बाईक विकत घेतली तिला मेंटेन करताना अनेक समस्या उद्भवतात. त्यातही ही जर बाईकचा मायलेज हवा तसा मिळत नसेल तर रायडर्सची नक्कीच चिडचिड होऊ शकते. अशावेळी अनेक जण युट्युबवरून निरनिराळे टिप्स ऐकून बाईकचा मायलेज वाढवायचा प्रयत्न करत असतात. परंतु उत्तम मायलेजसाठी बाईक कोणत्या स्पीडवर चालवावी याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
प्रत्येक बाइक रायडरला वाटते की त्याच्या बाईकने नेहमीच चांगले मायलेज दयावे. बाईक चांगले मायलेज देते याची खात्री करण्यासाठी हल्ली अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतात. असे असूनही अनेकांच्या बाईक योग्य मायलेज देत नाहीत. त्याच वेळी, अनेकांना काळजी वाटते की त्यांच्या बाईकची भरलेली इंधनाची टाकी काही दिवसांतच कशी काय संपते. हीच गोष्ट लक्षात घेऊन, अधिक मायलेज मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या वेगाने बाईक चालवली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया.
जर तुम्ही दररोज फक्त 4 ते 5 किलोमीटर बाईक चालवली तर फुल्ल टॅंक पेट्रोल महिनाभर तरी नक्कीच चालेले. त्याच बरोबर जर तुम्ही रोज 10 ते 20 किलोमीटर बाईक चालवली तर पेट्रोल 15 ते 20 दिवस टिकते. बाईक किती मायलेज देते हे ती चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. योग्य स्पीडने बाईक चालवली नाही तर मायलेज कमी होतो. तसेच काही स्पोर्ट्स बाईक आधीच कमी मायलेज देत असतात.
MG च्या ‘या’ कारमुळे कंपनीचे नशीब पालटले, विकल्या तब्बल 6 हजार कार्स
बाईकची आयडियल स्पीड म्हणजे ती स्पीड जिथे बाईक सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देते. हा वेग मायलेजसाठी चांगला मानला जातो. बाईकच्या आयडियल स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ती 40 ते 60 किमी/तास मानली जाते. या वेगाने बाइक जास्तीत जास्त मायलेज देते. जर तुम्ही दररोज जास्त वेळ बाईक चालवत असाल तर या वेगाने बाईक चालवल्यास तुम्हाला चांगला मायलेज मिळू शकेल. तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त वेगाने बाईक चालवल्यास तुम्हाला कदाचित हवे तितके चांगले मायलेज मिळणार नाही.
मोकळा रस्ता निवड
तुम्ही बाईक ट्रॅफिक असणाऱ्या आणि अरुंद रस्त्यांवर चालवू नका. बाईक चालवताना किंवा कुठेतरी जाताना, कमी रहदारी असलेले रस्ते निवडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला क्लच आणि गिअरचा वापर करावा लागेल आणि बाईकचे मायलेज वाढेल.
नियमित सर्व्हिसिंग महत्वाची
बाईकच्या मायलेजवर होणारा परिणाम थेट त्याच्या इंजिनच्या योग्य कार्याशी संबंधित आहे. हे लक्षात घेऊन बाईकची सर्व्हिस आणि मेंटेनन्स नियमित करून घ्या. बाईकचा प्रत्येक भाग नीट काम करेल तेव्हाच कुठे मायलेज योग्यरित्या वाढेल.