फोटो सौजन्य: iStock
आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढता दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार मालकाची इच्छा असते की त्यांच्या कारने कमी इंधनात जास्त मायलेज द्यावा. मात्र मायलेजबाबत अनेकदा लोकांच्या मनात विविध गैरसमज असतात. काहींच्या मते खूप हळू कार चालवल्यास मायलेज वाढते, तर काही जणांना वाटते की वेगात कार चालवणे अधिक किफायतशीर ठरते. प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींमध्ये एक ठरावीक वेग असा असतो, ज्यावर कार सर्वाधिक चांगले मायलेज देते. योग्य वेग आणि संतुलित ड्रायव्हिंग पद्धत अवलंबल्यास कारची फ्युएल एफिशियन्सी लक्षणीयरीत्या सुधारता येते.
Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या
बहुतेक पेट्रोल आणि डिझेल कारसाठी 70 ते 90 किलोमीटर प्रति तास हा वेग सर्वाधिक संतुलित मानला जातो. हायवेवर कार टॉप गिअरमध्ये 70–80 किमी/तास वेगात चालवल्यास इंजिनवर अनावश्यक ताण येत नाही आणि इंधनाचा वापर नियंत्रित राहतो. त्यामुळे या वेगमर्यादेत कार तिच्या बेस्ट मायलेजच्या जवळ पोहोचते.
शहरात मात्र वाहतूक, सिग्नल आणि वारंवार थांबावे लागल्याने जास्त वेग शक्य होत नाही. अशा परिस्थितीत 40 ते 50 किमी/तास वेगात स्मूथ आणि स्थिर ड्रायव्हिंग करणे अधिक फायदेशीर ठरते.
खूप जास्त वेगात कार चालवल्यास इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते. 100 किमी/तासांपेक्षा जास्त वेगावर हवेचा दाबही वाढतो, त्यामुळे इंधनाची खपत झपाट्याने होते. तसेच चुकीच्या गिअरमध्ये कार चालवणे मायलेजसाठी घातक ठरते. वारंवार ब्रेक लावणे आणि अचानक ॲक्सेलरेटर दाबणे ही इंधन वाया घालवणारी सर्वात मोठी चूक आहे.
February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी
हायवेवर तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोलचा पर्याय असल्यास त्याचा वापर नक्की करा. यामुळे एकसारखा वेग राखला जातो आणि मायलेज सुधारते. टायरमध्ये नेहमी योग्य प्रमाणात हवा ठेवा, कारण कमी हवा असलेल्या टायरमुळे जास्त फ्रिक्शन निर्माण होते. तसेच एसीचा वापरही गरजेपुरता आणि योग्य पद्धतीने केल्यास इंधनाची बचत करता येते.






