फोटो सौजन्य: Pinterest
हा प्रकल्प TMPV आणि JLR साठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील नेक्स्ट-जनरेशन वाहने आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EVs) उत्पादनासाठी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रतीक आहे. जागतिक स्तरावर लक्झरी, आधुनिक डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखली जाणारी रेंज रोव्हर इव्होक आता भारतातच उत्पादित केली जाणार आहे.
तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…
या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी टाटा सन्स आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच टाटा समूह आणि JLR चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, “टाटा समूहाचा राष्ट्रनिर्मितीतील सहभाग दीर्घकालीन असून तामिळनाडूसोबतचा त्यांचा संबंध ऐतिहासिक आहे. रानीपेटमधील पनापक्कम येथे या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे ऑटोमोटिव्ह उत्पादन राज्यात येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, नवकल्पना आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.”
पनापक्कम प्लांटमध्ये अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानासोबत कुशल स्थानिक मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. येथे कार्यरत टेक्निशियन ‘लक्ष्य – शिका आणि कमवा’ या टाटा मोटर्सच्या विशेष उपक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यांना देश-विदेशातील JLR प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये
या कर्मचाऱ्यांना कामासोबत प्रतिष्ठित विद्यापीठांतून कंपनी-प्रायोजित बी.टेक पदवी मिळवण्याची संधीही देण्यात येत आहे. यामुळे वैयक्तिक प्रगतीसोबतच व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना मिळत आहे.
टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढवून पुढील ५ ते ७ वर्षांत या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता २.५ लाख वाहनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी जवळपास ९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे ५,०००हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार असून, संपूर्ण सहाय्यक उद्योगसाखळीला चालना मिळणार आहे.






