फोटो सौजन्य: Pinterest
एमजी मोटर्सकडून Majestor SUV या आठवड्यात भारतात सादर केली जाणार आहे. कंपनीकडून या SUV मध्ये अनेक प्रीमियम फीचर्ससोबत दमदार इंजिन देण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये
लाँच होण्याआधीच या SUV ने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अलीकडेच MG Majestor ने नागालँडमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच डोंगर असलेल्या Mount Japfü वर यशस्वी चढाई केली आहे. अत्यंत अवघड आणि खडतर मार्गांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माउंट जाफूला सहज पार करत या SUV ने आपली ताकद सिद्ध केली आहे.
MG Motors कडून Majestor मध्ये अनेक अत्याधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये LED हेडलाइट्स, LED DRL, समोर मोठी ग्रिल, 20 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल टोन एक्सटीरियर, 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटीरियर, टाइप-C USB चार्जिंग पोर्ट, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, तसेच ड्रायव्हिंगसाठी विविध मोड्स देण्यात येऊ शकतात.
प्रवाशांच्या सेफ्टीच्या दृष्टीने या SUV मध्ये सहा एअरबॅग्स, ABS, EBD, हिल असिस्ट, BSD, LCA, RCTA, DOW, सेल्फ-अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ADAS सारखी प्रगत सुरक्षा फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीकडून अद्याप इंजिनबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, MG Majestor ही SUV पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह येण्याची शक्यता आहे. पेट्रोल इंजिनमधून सुमारे 184 किलोवॉट पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो. तर टर्बो डिझेल इंजिनमधून 160 किलोवॉट पॉवर आणि 500 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये 4X4 ड्राइव्ह सिस्टम दिली जाऊ शकते. पेट्रोल व्हेरिएंटची टॉप स्पीड 190 KMPH तर डिझेल व्हेरिएंटची टॉप स्पीड 175 KMPH पर्यंत असू शकते. यासोबतच 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येण्याची शक्यता आहे.
भारतात MG Majestor ही SUV अधिकृतपणे 12 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे. त्यानंतरच या SUV च्या किमतींची अचूक माहिती आपल्यासमोर समोर येईल. MG Majestor ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 40 ते 50 लाख रुपये दरम्यान असू शकते.






