1.77 लाखाचे झाले 984 कोटी रुपये, 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदार अल्पावधीत मालामाल!
प्रत्येकजण योग्य ठिकाणी गुंतवणूक करून शक्य तितक्या लवकर आपले पैसे दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा विचार करतो. अशा परिस्थितीत शेअर्समध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होण्याचा प्रयत्न नवीन नाही. अनिश्चिततेने भरलेल्या शेअर बाजारात कोणता शेअर कधी गगनाला भिडणार हे सांगता येत नाही. अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे.
5 वर्षांत 16877 टक्क्यांहून अधिक परतावा
गुंतवूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअर्समध्ये एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचा आहे. पाच वर्षांपूर्वीच्या या शेअर्सची किंमत पाहता, तो आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकेल असे कोणीही म्हणू शकत नव्हते. पण गेल्या 5 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 16877 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
मुहूर्त ट्रेडिंगच्या शेवटी 1 नोव्हेंबरला एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचा शेअर बीएसईवर 458.40 रुपयांवर बंद झाला. तर साेमवारी 4 नाेव्हेंबर राेजी शेअर्स 450 रुपयांवर आला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत एसजी फिनसर्व्हच्या शेअर्सने 16877.78 टक्के परतावा दिला आहे.
हे देखील वाचा – गुंतवणूकदारांची निराशा..! निफ्टी 24 हजारांच्या खाली, सेन्सेक्सची 942 अंकांनी घसरण!
1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये
अर्थात एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी एसजी फिनसर्व्ह लिमिटेडच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि आजपर्यंत शेअर्स विकले नसतील. तर गुंतवणूक 17 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, 20,000 रुपयांची गुंतवणूक 34 लाख रुपये, 50,000 रुपयांची गुंतवणूक अंदाजे 85 लाख रुपये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असती. त्यामुळे आता ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठा परतावा मिळाला आहे.
कंपनीचे मार्केट कॅप 2,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक
एसजी फिनसर्व्ह जुलै 2015 मध्ये शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाली. कंपनीला 2019 मध्ये एनबीएफसी म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून परवाना मिळाला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 12 जानेवारी 2024 रोजी शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 576 रुपये गाठला होता. तर 10 जुलै 2024 रोजी 325 रुपयांचा 52 आठवड्यांचा निच्चांक होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)