(फोटो सौजन्य:Chatgpt)
Air India Flight : तुम्ही विमानात बसून निघालाय आणि तुम्हाला कळलं की तुमचं विमान पाकिस्तानात पोहोचलं तर… असाच प्रकार नुकताच घडलाय. एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोमवारी रात्री म्हणजेच २२ जूनला २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन एक विमान दिल्लीहून अमृतसरसाठी निघाले होतं. मात्र, हे विमान अमृतसरला पोहोचण्याऐवजी विमान लाहोरला गेलं. थेट पाकिस्तानात पोहोचल्याचं कळताच पुढे काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात.
Elon Musk ला मोठा झटका! तिजोरीला मोठं भगदाड, Trillionaire होण्याचा मान हुकला, आता इतकीच राहिली…
ही घटना २२ जूनच्या रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-४७९ सोमवारी रात्री सुमारे ९:१५ वाजता दिल्ली विमानतळावरून अमृतसर विमानतळासाठी निघाले. अमृतसर विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाने तिथे लँडिंग केले नाही. बराच वेळ हवेत अनेक वेळा घिरट्या घातल्या आणि नंतर, विमानाने अमृतसर विमानतळावर उतरण्याऐवजी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केला. एअर इंडियाने अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सूत्रांनुसार, एअर इंडियाचे हे विमान केवळ पाकिस्तानी हवाई हद्दीतच शिरले नाही, तर ते लाहोरला सुद्धा पोहोचलं. आपण पाकिस्तानी हवाई हद्दीत शिरलो आहोत याची वैमानिकाला कल्पनादेखील आली नव्हती. लाहोर एटीसीने विमानाशी संपर्क साधल्या त्यानंतर वैमानिकाला कळवले की तो भारतीय हवाई हद्दीत नसून पाकिस्तानी हवाई हद्दीत आहे. या सगळ्यानंतर वैमानिकाला ही गोष्ट कळली. वैमानिकाला पाकिस्तानात येण्याचं कारण विचारण्यात आलं.
सूत्रांनुसार, एअर इंडियाच्या वैमानिकाने स्पष्ट केले की तो चुकून पाकिस्तानी हवाई हद्दीत शिरला होता. त्यानंतर वैमानिकाने यू-टर्न घेतला आणि तो अमृतसरच्या दिशेने निघाला. परंतु त्याला अमृतसरमध्ये उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्याला अमृतसरहून दिल्लीला परतावे लागले.
दिल्लीत पोहोचल्यानंतर, पहाटे १ वाजल्यानंतर थोड्याच वेळात विमान अमृतसरकडे वळवण्यात आले. खराब हवामान, तांत्रिक अडचण, की वैमानिकाने चुकून नियंत्रण गमावलं नेमकं काय घडलं आणि विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश पोहोचलं याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.






