यूएसएचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs USA, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई येथीळ वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आपले जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर अमेरिका संघ भारताला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यावेळी हर्षित राणाच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे.
टॉस जिंकून यूएसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार मोनंक पटेल म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे. ही एक मोठी धावसंख्या होणारी खेळपट्टी आहे, त्यामुळे आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू. अमेरिकेकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही डीवाय पाटील स्टेडियमवर काही सराव सामने खेळलो आणि तिथे आमची कामगिरी चांगली झाली होती. आमच्या संघात ६ फलंदाज, २ अष्टपैलू आणि ३ गोलंदाज आहेत.
भारतीय संघाने टॉस गामावल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला कि, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. येथील खेळपट्टी चांगली दिसत आहे. मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे. येथे वाराही वाहत आहे, त्यामुळे नंतर दव पडेल असे मला वाटत नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन संघात नाहीत. दुर्दैवाने जसप्रीत बुमराहची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मोहम्मद सिराज खेळत आहे.”
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have been put into bat first! Updates ▶️ https://t.co/Rlm2ARPVEt#MenInBlue | #T20WorldCup | #INDvUSA pic.twitter.com/oTIl8rS557 — BCCI (@BCCI) February 7, 2026
टी-२० स्वरूपात भारत आणि अमेरिका फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकात भारता आणि अमेरिका संघ भिडले होते. हा सामना भारताने ७ विकेटने आपल्या खिशात टाकला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ११० धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. तथापि, अमेरिका निश्चितच भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामाना रोमांचक होणीयकी शक्यता आहे.
भारत इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर






