मुंबई विमानतळावर 'सेल्फ बॅग ड्रॉप' सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार (Photo Credit- X)
विमानतळावर सेल्फ-सर्विस बॅगेज सुविधांच्या अवलंबनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर हे काऊंटर्स लाँच करण्यात आले आहेत. ऑटोनॉमस एसबीडी वापरामध्ये कॅलेंडर वर्ष २०२४ मधील ३८८,४४६ प्रवाशांच्या तुलनेत वार्षिक ४० टक्क्यांनी वाढून कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये ५६०,२७५ प्रवाशांपर्यंत वाढ झाली, ज्यामधून जलद व अधिक सुलभ प्रवासी प्रक्रियेला साह्य करण्याकरिता विकासात्मक पायाभूत सुविधेसाठी गरज दिसून येते.
एकाच प्रक्रियेमध्ये चेक-इन व बॅगेज ड्रॉपला एकीकृत करत हायब्रिड एसबीडी काऊंटर्स मॅन्युअल हस्तक्षेप कमी करतात, तसेच प्रवाशांचया प्रतिक्षा वेळ देखील कमी होतो. ही यंत्रणा पात्र प्रवाशांना त्याच काऊंटरवर सामानाशी संबंधित पेमेंट व्यवहार पूर्ण करण्याची सुविधा देते, ज्यासह प्रक्रिया सुव्यवस्थितपणे होते आणि स्वतंत्र एअरलाइन डेस्क्सवरील अवलंबन कमी होते.
सेल्फ-सर्विस मोडमध्ये सिंगल हायब्रिड एसबीडी काऊंटर समकालीन मॅन्युअल प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या २५ ते ३० प्रवाशांच्या सामानांच्या तुलनेत प्रतितासाला जवळपास १०० ते १२० प्रवाशांच्या सामानाला हाताळू शकते, ज्यामुळे सामान हाताळणी क्षमतेमध्ये जवळपास चारपट वाढ होते. या सुधारणेमुळे सामान स्वीकारण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होईल आणि टर्मिनलच्या पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षम वापर होईल.
SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!
प्रत्येक हायब्रिड एसबीडी काऊंटर ऑपरेशनल स्थिरतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि साध्या यंत्रणेच्या माध्यमातून मॅन्युअल व सेल्फ-सर्विस मोड्सदरम्यान स्विच करू शकते. यामुळे विमानतळ व एअरलाइन टीम्सना ऑपरेशनल आवश्यकतांनुसार कार्यक्षमतेसह वैयक्तिक साह्यतेमध्ये संतुलन राखता येते.
या विकासाबाबत मत व्यक्त करत सीएसएमआयएचे प्रवक्ता म्हणाले, ”सामानाची हाताळणी करणे हे डिपार्चर प्रवासामधील महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येसह सीएसएमआयए आपल्या चेक-इन व बॅगेज ड्रॉप पायाभूत सुविधेमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करत आहे, ज्यामुळे कार्यक्षमता वाढण्यासह स्थिरता कायम आहे. हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप काऊंर्ट्स आम्हाला मागणीनुसार क्षमता वाढवण्याची सुविधा देतात, तसेच आम्ही सहाय्यक सेवांची आवश्यकता असलेल्या प्रवाशांना मदत करणे सुरू ठेवले आहे.”
सध्या, इंडिगो व एअर इंडियाने टी२ येथे हायब्रिड एसबीडी यंत्रणा तैनात करण्याचा अवलंब केला आहे. आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स जसे लुफ्थान्सा, एअर फ्रान्स, कतार, स्विस आणि केएलएम विद्यमान ऑटोनॉमस एसबीडी सुविधेचा वापर करत आहे, तसेच त्यांना हायब्रिड एसबीडी प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हायब्रिड एसबीडी यंत्रणा डिजियात्रा बायोमेट्रिक तंत्रज्ञानासह देखील एकीकृत करता येऊ शकते, ज्यासह नोंदणीकृत प्रवाशांना जलद प्रक्रिया आणि कमी मॅन्युअल डॉक्यूमेंट तपासणीसाठी फेशियल रेकग्निशनचा वापर करता येईल.
या परिवर्तनादरम्यान प्रवाशांना साह्य करण्यासाठी सीएसएमआयएने टर्मिनलमध्ये प्रशिक्षित एसबीडी सहाय्यक तैनात केले आहेत, जे पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करणाऱ्या आणि वृद्ध प्रवाशांना सेल्फ-सर्विस प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करतात.
लाँच करण्यात आलेल्या हायब्रिड एसबीडी काऊंटर्ससह सीएसएमआयए टी२ येथे ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवत आहे, तसेच वेग, सोयीसुविधा आणि विश्वासार्हतेच्या जागतिक विमानतळ मानकांशी सुसंगत राहून भविष्यातील प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी ही यंत्रणा सक्षम केली जात आहे.
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम






