इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगदरम्यान इन्शुरन्स का महत्त्वाचा (फोटो सौजन्य - iStock)
तुमच्या खास इंटरनॅशनल ट्रिपसाठी तयारी करत असाल तर डोळ्यांना न दिसणारी, पण अत्यंत आवश्यक असलेली एक गोष्ट घ्यायला विसरू नका, ते म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स. पासपोर्ट आणि विमानाचे तिकीट सोबत असणे गरजेचे आहेच, पण ट्रॅव्हल इन्श्युरन्सकडे बरेचदा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण समजा तुमचे बॅगेज पॅरिसमध्ये गहाळ झाले, दुबईला जाणाऱ्या कनेक्टिंग विमानाला विलंब झाला किंवा तुम्हाला बालीमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधेची गरज लागली तर?
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन या नावावरून लक्षात आले असेलच की या अंतर्गत तुमच्या भारताबाहेरील प्रवासाला इन्शुरन्स संरक्षणाचे कवच प्राप्त होते. युजर त्यांच्या प्रवासाच्या कालावधीसाठी हे प्लॅन्स निवडू शकतात. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना किंवा मित्रमंडळींना अनपेक्षित वैद्यकीय खर्च, प्रवासात होणारा विलंब किंवा कॅन्सलेशन्स, बॅगेज हरवणे किंवा चोरी होणे यांसारख्या आर्थिक जोखमींपासून संरक्षण मिळू शकते. तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्सची आवश्यकता का आहे? जाणून घ्या
इन्शुरन्स किती महत्त्वाचे
भारतीय प्रवासी आज जगभरात प्रवास करत आहेत. विमान आणि हॉटेलचे बुकिंग तर केले जातेच, पण अनेक जण आजही इन्शुरन्सशिवाय प्रवास करतात किंवा अतिशय मर्यादित कव्हरेज असलेल्या प्लॅनवर समाधान मानतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी संपूर्ण संरक्षण देणाऱ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स प्लॅनमध्ये खालील घटक असणे अपेक्षित आहे :
कशा प्रकारे गरज भासते?
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवासात अडथळा निर्माण होणे, कुटुंबातील इमर्जन्सी किंवा प्रवासात अचानक बदल झाला, तरी इन्श्युरन्स असेल तर आर्थिक संरक्षण प्राप्त होते.
फोनपे वर सोप्या आणि सुलभ पद्धतीने ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्राप्त करा. फोनपे ने ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी प्रक्रिया अगदी सोपी केली आहे, जेणेकरून ट्रॅव्हलर्सना एजंट, पेपरवर्क आणि छुप्या शुल्काची काळजी करावी लागणार नाही.
कोणत्या गोष्टी होतात कव्हर
काय आहेत खास वैशिष्ट्य
ट्रॅव्हलर्स कायम कनेक्टेड राहावेत, याची खात्री करण्यासाठी फोनपे ट्रव्हल इन्श्युरन्स व्यतिरिक्त मेट्रिक्स सेल्युलर इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे, फोनपे प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या प्रत्येक इन्श्युरन्स पॉलिसीसोबत कॉम्प्लिमेंटरी मेट्रिक्स eSIM मिळते, ज्यात 500MBचा इंटरनॅशनल डेटा समावेश असतो आणि यासाठी कोणतीही अतिरिक्त किंमत आकारण्यात येत नाही.
eSIM पण मिळणार
आता प्रवाशांना स्थानिक सिम कार्ड शोधण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही आणि महागडे रोमिंग चार्जेसही लागणार नाहीत. फोनपे वर आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतल्यानंतर, eSIM सेटअपची लिंक थेट ईमेल इनबॉक्समध्ये येते. विमानतळावर उतरताच वापर सुरू करता येऊ शकतो. यामुळे एकाच वेळी युजरना इन्श्युरन्सही मिळतो आणि eSIM मिळते.
बोनस टीप : युजरना स्मार्टफोनमध्ये eSIM फंक्शनॅलिटी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पॉलिसीवर एकच eSIM देण्यात येते. अधिक डेटा हवा असल्यास, युजर मेट्रिक्स सेल्युलर इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि.च्या वेबसाइटवर जाऊन टॉप-अप करू शकतात.
फक्त 5 सोप्या स्टेप्स






