आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने भविष्यकालीन अभियांत्रिकी संवादासाठी संशोधन
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) ने आज इंटरनॅशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉंग्रेस अँड एक्स्पोझिशन (आयएमईसीई) इंडिया 2025 या जगातील सर्वात मोठ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग काँग्रेसचे आयोजन पुढे चालू ठेवले. हे आयोजन प्रथमच हैदराबाद येथे झाले असून या कार्यक्रमाने विचारप्रवर्तक मुख्य भाषणे आणि धोरणात्मक चर्चांद्वारे भारताच्या अभियांत्रिकी आणि नवोपक्रमातील नेतृत्वाला विशेष प्रकाशझोत दिला आहे. कार्यक्रमादरम्यान संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने एएसएमई आणि केरळ आयसीटी अकादमी यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.
यावेळी आंध्र प्रदेश सरकारचे एमएसएमई मंत्री श्रीनिवास कोंडापल्ली यांनी सांगितले की, “एएसएमईच्या आयएमईसीई इंडिया 2025 चा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. मजबूत पायाभूत सुविधा, विविध क्षेत्रीय पार्क आणि इनोव्हेशन हब यांच्या बळावर आंध्र प्रदेश जलद गतीने उत्पादन, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि निर्यात यांचे केंद्र म्हणून उदयास येत आहे—जे भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 8% योगदान देत आहे. दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे, गुंतवणुकीस तयार औद्योगिक नोड्स आणि शाश्वततेवर केंद्रित दृष्टीकोनामुळे राज्य उद्योग आणि स्टार्टअप्ससाठी अभूतपूर्व संधी निर्माण करत आहे. आयएमईसीई इंडिया हा दृष्टिकोन अधिक सक्षम करतो, कारण तो जागतिक सहकार्य सुलभ करतो, अभियांत्रिकी संशोधनाला चालना देतो आणि अकादमिक-उद्योग भागीदारी मजबूत करतो, ज्यामुळे भारताला नवोपक्रम-आधारित अर्थव्यवस्था म्हणून नव्याने घडवण्यास मदत होते. आपण सर्व मिळून असा पाया रचत आहोत की जिथे भारत शाश्वत नवोपक्रम आणि औद्योगिक वाढीत जगाचे नेतृत्व करेल.”
स्कायरूट एरोस्पेसचे सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी आयएमईसीई 2025 मधील आपल्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले, “भारत आता केवळ प्रगत तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नाही — आम्ही आता जागतिक स्तरावर अत्याधुनिक ‘डीप टेक’ निर्माण करून त्याची निर्यातही करत आहोत. संरक्षण क्षेत्रापासून ड्रोनपर्यंत, बायोटेकपासून क्वांटमपर्यंत आणि अवकाशापासून सेमिकंडक्टरपर्यंत भारतीय स्टार्टअप्स अशा महत्त्वपूर्ण शोधांना चालना देत आहेत, जे उद्योग आणि समाज या दोघांमध्ये आमूलाग्र बदल घडवतील. स्कायरूटला ‘आयएमईसीई इंडिया 2025’चा भाग बनून अत्यंत आनंद झाला आहे आणि अशा व्यासपीठांमुळे भारताला आपले नवोपक्रम जागतिक पातळीवर प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”
एएसएमई इंडिया चे अध्यक्ष आणि संचालक मधुकर शर्मा म्हणाले, “आयएमईसीई इंडिया 2025 हा भारतीय अभियंते, संशोधक आणि विस्तृत तांत्रिक समुदायासाठी एक परिवर्तनकारी क्षण आहे. आमच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी समुदायांच्या माध्यमातून, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि 3डी प्रिंटिंग, ॲडव्हान्स्ड मटेरियल्स आणि उत्पादन तंत्रज्ञान, थर्मल तंत्रज्ञानातील प्रगती, गॅस टर्बाइन्स, ऑफशोअर पाइपलाइन्स ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सायबर-फिजिकल सिस्टीम्स + एआय/एमएल, तसेच संरचना, संरचनात्मक डायनॅमिक्स आणि मटेरियल्स यांसारख्या क्षेत्रांचा समावेश करून, आम्ही अधिक शाश्वत आणि नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यास सक्षम होत आहोत.”
“अॅडव्हान्सिंग न्यू एनर्जी – क्लीन एनर्जी ट्रान्झिशनसाठी ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या जलद विकास आणि अंमलबजावणीसाठी सक्षम व सशक्त पायाभूत सुविधा उभारणे” या विषयावर झालेल्या मुख्य भाषणात आयएमईसीई इंडियाची मुख्य तत्त्वे शाश्वतता, नवोपक्रम आणि सर्वसमावेशकता यांचा परावर्तित स्वरूप दिसून आला. भारताने आधीच स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानांना, विशेषतः हायड्रोजन आणि वेस्ट-टू-एनर्जीला पाठबळ देण्यासाठी मजबूत परिसंस्था उभारण्यात जलद प्रगती केली आहे. पायलट-स्तरावरील 1 मेगावॅट ते 10 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, तर नियंत्रक मंडळे सक्रियपणे अनुपालन आणि प्रमाणन यंत्रणा आखत आहेत. तरीदेखील जास्त खर्च, कमी तापमानातील साठवणूक आणि मनुष्यबळाचे कौशल्य-विकसन यांसारखे काही प्रमुख आव्हाने शिल्लक आहेत. या पॅनेल चर्चेत उद्योग, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि सरकार यांच्यातील सहकार्यासाठी मार्ग शोधण्यात आले, ज्यामुळे नवोपक्रमाला गती मिळेल, ऊर्जा सर्वांना न्याय्य पद्धतीने उपलब्ध होईल आणि ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत 2047’, ‘इंडिया सेमिकंडक्टर मिशन’ आणि ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांसोबत संरेखित अशी सुसंगत आणि भविष्याभिमुख स्वच्छ ऊर्जा पायाभूत रचना उभी राहील.