जेष्ठ नागरिकांना घरुनच करता येणार बँक व्यवहार
हल्लीच्या काळात बँकेशी संबंध येत नाही. असा एकही व्यक्ती भेटणार नाही. यातही नेट बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहाराची फारशी कल्पना नसल्याने जेष्ठ नागरिकांचा संबंध हा थेट बँकेशी येत असतो. अनेक जेष्ठ नागरिकांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. याशिवाय अनेकदा ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. मात्र, आता बँकेच्या कामांसाठी जेष्ठ नागरिकांची होणारी ससेहोलट थांबणार असून, आता देशातील सर्व जेष्ठांना घरुनच बँक व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सरकारकडून नवीन कार्यपद्धती लागू
याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी सरकारने नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. ज्याद्वारे आता जेष्ठ नागरिकांना घरुनच बँक व्यवहार करता येणार आहे. प्रामुख्याने आजारपणामुळे किंवा वय झाल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत असतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याकडून याबाबात नवीन कार्यपद्धती नुकतीच लागू करण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
बँक अधिकाऱ्यांसमोर अंगठ्याचा ठसा घेण्याची मुभा
दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, संयुक्त बँक खात्याची सुविधा उपलब्ध करणे, बँकांचे व्यवहार करण्यासाठी पालक नियुक्ती करणे आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणे. हे शक्य नसेल तर पैसे काढण्याची पावतीवर स्वाक्षरी करणे, स्वाक्षरी करता येत नसेल तर बँक अधिकाऱ्यांसमोर अंगठ्याचा ठसा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बँक खात्यात जमा केले जाते. गरजेप्रमाणे त्यातून रक्कम काढली जाते. मात्र, आजारपणामुळे किंवा वय जास्त झाल्यामुळे बँकेत जाणे शक्य होत नाही, किंवा हालचाल करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन कार्यपद्धती लागू केली आहे.