Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती
ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या नेतृत्व रचनेत महत्वपूर्ण बदल करत राजर्षी मोइत्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्ती १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. सध्या ते कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.
ते हिरोशी योशिझाने यांच्या जागी पदभार स्वीकारतील. श्री. योशिझाने जानेवारी 2024 पासून ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मे 2025 पासून BSAPIC (Bridgestone Asia Pacific, India, China) समूहाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
१ जानेवारी २०२६ पासून योशिझाने यांची ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून पदोन्नती होणार आहे. ते पुढेही BSAPIC समूहाध्यक्ष, ब्रिजस्टोन इंडिया संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि ATMA (Automotive Tyre Manufacturers Association) चे उपाध्यक्ष या पदांवर काम करत राहतील.
Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक
राजर्षी मोइत्रा यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “ब्रिजस्टोन इंडियाचे नेतृत्व स्वीकारणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ‘उत्कृष्ट दर्जासह समाजाची सेवा’ या ब्रिजस्टोनच्या ध्येयाशी सुसंगत राहून आम्ही ग्राहक, ओईएम भागीदार आणि समुदायासाठी अधिक मूल्य निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवणार आहोत.”
आपल्या संदेशात योशिझाने म्हणाले, “ब्रिजस्टोन इंडिया हे कंपनीच्या जागतिक वाढीतील महत्त्वाचे केंद्र आहे. आम्ही एकत्रितपणे व्यवसाय प्रक्रिया मजबूत केल्या, सुरक्षा व दर्जा उंचावला आणि R&D व शाश्वत उपक्रमांत मोठी प्रगती केली. राजर्षी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आणखी पुढे जाईल, याचा मला विश्वास आहे.”
Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?
मोइत्रा यांना २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून बिझनेस स्ट्रॅटजी, सेल्स, मार्केटिंग, प्रॉफिट सेंटर मॅनेजमेंट आणि मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
या काळात त्यांनी कंझ्युमर, कमर्शियल, सोल्यूशन बिझनेस तसेच लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन विभागांचे नेतृत्व केले.
ब्रिजस्टोन इंडिया शाश्वत मूल्यनिर्मितीच्या दिशेने पुढील वाटचाल करत असून “Bridgestone E8 Commitment” या मूल्यांनुसार कार्यरत आहे. या अंतर्गत एनर्जी, इकोलॉजी, एफिशिअन्सी, इकोनॉमी, एक्स्टेन्शन, ईझ, इमोशन आणि एम्पॉवरमेंट या आठ मूल्यमंत्रांचा समावेश आहे.
कंपनीने व्यवस्थापन संरचना अधिक परिणामकारक बनवून शाश्वत समाजनिर्मिती आणि दीर्घकालीन व्यवसाय वृद्धी साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे.






