देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक, PM धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेअतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.