आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; अर्थसंकल्पात मोठी घोषणा (फोटो सौजन्य-X)
Budget 2025 SWAMIH fund in Marathi: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. याचदरम्यान आपले स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण आता घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर गेल्या आहेत.याचपार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) २०२५ च्या अर्थसंकल्पात ‘स्वामी निधी’ची घोषणा केली आहे. या निधीचा उद्देश रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करणे आणि मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे.एकंदरित आता सर्वसामान्यांना परवडणारी घर उपलब्ध होणार आहे. काय आहे स्वामी निधी ?
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ४०,००० रखडलेली आणि अपूर्ण घरे पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ५०,००० घरे पूर्ण झाली आहेत आणि घर खरेदीदारांना त्यांच्या घरांच्या चाव्या दिल्या जात आहेत. हा प्रकल्प सरकारने तयार केलेल्या स्वामी निधी मधून तयार करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्रातील रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने २५,००० कोटी रुपयांचा स्वामी निधी (परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गृहनिर्माण निधीसाठी विशेष खिडकी) तयार केला होता. परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी या गुंतवणूक निधीद्वारे देशभरातील ५०,००० हून अधिक रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण केले जात आहेत.
SWAMIH Fund (Special Window for Affordable & Mid-Income Housing Fund) निधी हा रिअल इस्टेट क्षेत्रातील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना आर्थिक मदत प्रदान करण्याच्या उद्देशाने एक सरकारी उपक्रम आहे. असे अनेक प्रकल्प आहेत जे कायदेशीर अडचणी, आर्थिक संकट किंवा इतर कारणांमुळे अपूर्ण राहतात. या निधीमुळे त्या प्रकल्पांना पुनरुज्जीवित केले जाईल आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळेल.
रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना आर्थिक मदत
मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे
रिअल इस्टेट क्षेत्रात वाढती तरलता
बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवणे
घर खरेदीदारांना दिलासा: वर्षानुवर्षे घराची वाट पाहणाऱ्यांना लवकरच घराचा ताबा मिळू शकेल.
रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना: बाजारात अडकलेल्या पैशाला गती मिळेल, ज्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करणे देखील शक्य होईल.
अर्थव्यवस्थेला चालना: गृहनिर्माण क्षेत्रातील सुधारणा इतर संबंधित उद्योगांना (सिमेंट, स्टील, बांधकाम) देखील फायदेशीर ठरेल.