अर्थसंकल्पीय आठवड्यात हे 8 IPO लॉन्च होणार; वाचा... शेअर बाजारात गुंतवणूक करावी की नाही?
जसजशी अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ जवळ येत आहे. तशीतशी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहे. अशातच आता येत्या अर्थसंकल्पीय आठवड्यात शेअर बाजारात ८ नवीन आयपीओ लॉन्च होणार आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात गुंतवणूक करावी की नाही याबाबत गुंतवणूकदार संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखाद्या आयओपीचे शेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात नेमके कोणते आयपीओ बाजारात दाखल होणार याबाबत आपण जाणून घेणार आहोत…
‘ही’ आहेत येणारी आठ आयपीओंची नावे?
शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार, या आठवडाभरात 8 नवीन कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आठ आयपीओ केवळ लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) विभागामध्ये लॉन्च केले जाणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पीय आठवड्यात ज्या कंपन्यांचे आयपीओ लॉन्च केले जाणार आहेत. त्यामध्ये RNFI सर्व्हिसेस, SAR टेलिव्हेंचर, VVIP इन्फ्राटेक, VL इन्फ्राप्रोजेक्ट्स, मंगलम इन्फ्रा अँड इंजिनिअरिंग, चेतना एज्युकेशन, अप्रमेया इंजिनिअरिंग आणि क्लिनीटेक लॅबोरेटरी या कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा… : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कोसळेल की सुधारेल? वाचा… काय सांगितलंय तज्ज्ञांनी?
अर्थसंकल्पाच्या दिवशी लॉन्च होणार ‘हे’ आयपीओ
चालू अर्थसंकल्पीय आठवड्यात अर्थसंकल्पाच्या दिवशी 23 जुलै रोजी VVIP इन्फ्राटेक आणि VL इन्फ्राप्रोजेक्ट्स या दोन कंपन्यांचे IPO लॉन्च होणार आहे. त्यानंतर 24 जुलै रोजी मंगलम इन्फ्रा अँड इंजिनिअरिंग आणि चेतना एज्युकेशनचे आयपीओ शेअर बाजारात खुले होतील. तर Aprameya अभियांत्रिकी आणि Clinitech प्रयोगशाळेचे आयपीओ 25 जुलै रोजी लॉन्च होणार आहे.
उद्या खुले होणार ‘हे’ आयपीओ
RNFI सर्व्हिसेस आणि SAR टेलिव्हेंचरचे IPO 22 जुलै रोजी खुले होणार आहे. तर 24 जुलै रोजी बंद होतील. RNFI सर्व्हिसेस IPO ची किंमत 98 ते 105 रुपये आहे. या IPO चा आकार 70.81 कोटी रुपये इतका आहे. तर SAR Televenture च्या IPO ची किंमत 200 ते 210 रुपये इतकी आहे. ही कंपनी IPO मधून 150 कोटी रुपये उभारणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)