कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्युरोडिजेनेरेटिव्ह आणि चिंताजन्य विकारांसाठी कॅप्सूल केले लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नाविन्यपूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवेसाठीच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित करत भारतातील सर्वात आदरणीय आणि संशोधनाधारित औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्यु न्युट्रिडॅक हे क्लिनिकली सिद्ध झालेले न्यूट्रिशनल रिप्लेनिशर लाँच केले आहे. हे औषध न्युरोडिजेनेरेटिव्ह आजार आणि चिंताजन्य विकार असलेल्या रुग्णांना सहाय्य करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.
न्यु न्युट्रिडॅक संपूर्ण पोषणतत्वांचा प्रोफाईल देते ज्यामुळे संज्ञानात्मक (cognitive) कार्यक्षमता सुधारते आणि मनःस्थितीचे नियमन होते. प्रत्येक सेलुलोज कॅप्सूलमध्ये आठ महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे – पॅनॅक्स जिनसेंग एक्स्ट्रॅक्ट, गिंग्को बिलोबा, बेंफोटियामिन, पायरिडॉक्सल ५-फॉस्फेट, एल-मेथिल फोलेट, क्रोमियम पिकोलिनेट, बायोटिन आणि व्हिटॅमिन बी१२ – जे त्यांच्या न्युरोप्रोटेक्टिव्ह आणि मूड-स्टॅबिलायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात.
वैज्ञानिक अभ्यास पॅनॅक्स जिनसेंगच्या स्मरणशक्ती व संज्ञानात्मक कामगिरी सुधारण्यात असलेल्या उपचारक्षमतेवर प्रकाश टाकतात, ज्यात अल्झायमर रोगाचाही समावेश आहे. हे अमायलॉइड-बीटा संचय आणि टाऊ हायपरफॉस्फॉरिलेशनसारख्या महत्त्वाच्या रोगजन्य प्रक्रियांना लक्ष्य करते. गिंग्को बिलोबा प्रबळ अँटिऑक्सिडंट क्रिया करते, इस्केमिक न्युरॉनल मृत्यूपासून संरक्षण करते, न्युरॉनल प्लास्टिसिटी वाढवते आणि वयानुसार कमकुवत होणाऱ्या मेंदूतील रिसेप्टर्सचे संरक्षण करते. बी जीवनसत्त्वे, ज्यात बायोटिन (B7) आणि एल-मेथिल फोलेट (B9) यांचा समावेश आहे, मूड स्थैर्य, निरोगी झोप आणि ऊर्जा चयापचयाला अधिक आधार देतात.
कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव आय. मोदी म्हणाले, “कॅडिला फार्मास्युटिकल्समध्ये आम्ही मानतो की आरोग्यसेवा केवळ उपचारापुरती मर्यादित नसून ती प्रतिबंध आणि पुनर्निर्मितीची देखील असावी. न्यु न्युट्रिडॅकच्या माध्यमातून आम्ही न्युरोलॉजिकल व चिंताजन्य विकारांमध्ये पुराव्यावर आधारित पोषणात्मक सहाय्याची वाढती गरज पूर्ण करत आहोत. औषधी वनस्पती व आवश्यक जीवनसत्त्वांच्या या अद्वितीय मिश्रणामुळे रुग्ण व डॉक्टरांना संज्ञानात्मक आणि भावनिक आरोग्यासाठी एक विश्वासार्ह, सर्वंकष पर्याय मिळतो.”
सुरक्षित आणि क्लिनिकली मान्यताप्राप्त असलेले न्यु न्युट्रिडॅक हे संज्ञानात्मक क्षीणता, चिंताजन्य विकार किंवा न्युरोडिजेनेरेटिव्ह बदलांच्या सुरुवातीच्या अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी शिफारस केले जाते. हे मानक उपचारांसोबत एक पूरक म्हणूनही वापरले जाऊ शकते.
सहा दशकांहून अधिक काळ कॅडिला फार्मास्युटिकल्स आरोग्य क्षेत्रातील नवकल्पनांच्या आघाडीवर आहे. न्युरोलॉजी, सायकेट्री, ऑन्कोलॉजी, कार्डिओलॉजी आणि संसर्गजन्य आजारांमध्ये त्यांनी क्रांतिकारी उपाय सादर केले आहेत. भारतातील पहिले व्हिटॅमिन डी इंजेक्शन (कॅल्सिरॉल) सादर करण्यापासून मायसिडॅक-सी आणि पॉलिकॅपसारख्या क्रांतिकारी उपचार लाँच करण्यापर्यंत, कॅडिला फार्मास्युटिकल्सने किफायतशीर व उच्च-गुणवत्तेच्या आरोग्यसेवेत सातत्याने नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. न्यु न्युट्रिडॅकच्या लाँचसह, कंपनी आपल्या या वारशाचा विस्तार करून संज्ञानात्मक आरोग्य सुधारण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी प्रगत पोषण विज्ञान आणत आहे.