File Photo : Tomato
गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तर ग्राहकांना मात्र टोमॅटो खरेदी अवघड झाले आहे. जुलैअखेपर्यंत टोमॅटोचे दर नियंत्रणात येतील, अशी केंद्र सरकारला अपेक्षा होती. मात्र, देशाच्या दक्षिण भागात खरिपातील टोमॅटो सुरु झालेला असतानाही टोमॅटोचे काही केल्या आटोक्यात येत नाहीये. हीच बाब लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने टोमॅटो दर नियंत्रणासाठी प्लॅन बनवला आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे सरकारचा प्लॅन?
सध्या टोमॅटो बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. मात्र, आता केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो या अल्प दरात टोमॅटो विक्री करणार आहे. केंद्र सरकारची सरकारी संस्था असलेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून (एनसीसीएफ) अल्प दरात टोमॅटो विक्री केली जाणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : तब्बल… 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!
कधीपासून सुरु होणार स्वस्तात टोमॅटो विक्री
नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एनसीसीएफ) माहितीनुसार, केंद्र सरकारकडून टोमॅटोची ही अल्प दरात विक्री 29 जुलै 2024 पासून सुरु केली जाणार आहे. ही विक्री सध्या तरी राजधानी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरांमध्ये सुरु केली जाणार आहे. या सरकारी टोमॅटो विक्रीद्वारे ग्राहकांना अल्प दरात टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध करून देणे, हा उद्देश आहे. असेही एनसीसीएफने म्हटले आहे.
किती आहे सध्या दर?
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत असून, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या दिल्ली येथील बाजारात टोमॅटो ७७ ते ८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा होत नसल्याने राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ सुरूच आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत टोमॅटोचे दर 165 रुपये किलोपर्यत पोहोचले होते. यावेळी मात्र टोमॅटोचे दर जवळपास निम्म्याने कमी आहेत.