• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Cm Udhhav Thackaray Reaction On Budget Nrps

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 01, 2022 | 07:14 PM
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रियाशक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे  अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

या व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेपुढे अनेक स्वप्नं उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्नं पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातून लोकांसमोर मांडण्यात आली आहेत. परंतू पूर्वीच्या आणि आताच्या स्वप्नांची उद्दिष्ट पूर्तीची कोणतीच दिशा हा अर्थसंकल्प दाखवत नाही.

[read_also content=”क्रिप्टो करन्सीसाठी एकाचे अपहरण, मास्टरमाइंड निघाला पोलीस शिपाई https://www.navarashtra.com/latest-news/one-kidnapped-for-cryptocurrency-mastermind-goes-police-cop-nrdm-231048.html”]

अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची अर्थविकासाची दिशा देण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करतांना २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर देणार हे स्वप्नं ही केंद्र सरकारने दाखवले होते. आज २०२२ साल सुरु झालं आहे,शेतकऱ्यांचे उत्पन्न खरच दुप्पट झाले का, प्रत्येकाला घर मिळाले का याचे कोणतेही उत्तर हा अर्थसंकल्प देत नाही. या आश्वासनपूर्तीला केंद्र सरकार कुठे कमी पडले,  आपण तिथपर्यंत कधी पोहोचणार याची दिशाही यात दाखवलेली नाही. म्हणजे जुनी स्वप्ने विसरुन नव्या स्वप्नांना रुजवण्याचे प्रकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होत आहेत की काय अशी मनात शंका येते. असेही ते म्हणाले.

[read_also content=”ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर अखेर राज्यपालांची स्वाक्षरी: भुजबळांनी मानले आभार; आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष! https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/pave-the-way-for-obc-reservation-231030.html”]

अर्थसंकल्पात ग्रामीण‍ विकास आणि नरेगाची तरतूद कमी करण्यात आली आहे. यामुळे ना केवळ ग्रामीण भागाच्या विकासात अडचणी निर्माण होतील परंतू नरेगामधून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरही त्याचा परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

गृहनिर्माण क्षेत्र ज्यात रोजगाराच्या प्रचंड संधी असतात त्या क्षेत्रात परवडणाऱ्या घरांसाठी खासगी विकासकांशी चर्चा करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे  प्रत्यक्षात गृह खरेदीला चालना देणारे निर्णय या अर्थसंकल्पात अपेक्षित होते.  त्याचा कुठलाच उल्लेख अर्थसंकल्पात नाही. ८० लाख घरे बांधणार परंतू ती खरेदी करण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्ये आली पाहिजे याकडे अर्थसंकल्पाने पूर्णपणे डोळेझाक केलेली दिसते.पंतप्रधान आवास योजनेसाठी फक्त ४८ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे, सामाजिक क्षेत्राकडे या अर्थसंकल्पाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याच्या घोषणेव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शेती क्षेत्रावरचे अवलंबित्व वाढले आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात हव्या होत्या. शाश्वत सिंचनापलिकडे जाऊन कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, त्यातून रोजगार निर्मितीचा कार्यक्रम या अर्थसंकल्पातून अपेक्षित होता.

[read_also content=”आगामी पालिका निवडणुकीत मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, आमदार राजहंस सिंह यांचा दावा https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mla-rajhans-singh-said-that-next-mla-of-mumbai-will-be-of-bjp-nrsr-231024.html”]

पाच वर्षात ६० लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. स्टार्टअपसाठी  कर सवलत योजना एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. परंतू मुळातच या क्षेत्रातहोणारी गुंतवणूक कमी झाली आहे. आज कोरोनामुळे लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांची स्थिती खुपअडचणीची आहे. अशा परिस्थितीत तरूणांच्या हाताला काम देतांना हा रोजगार निर्मितीचा वेगवाढवण्यासाठीच्या उपाययोजना अर्थसंकल्पात हव्या होत्या.

राज्यांना भांडवली खर्चासाठी दिलेल्या व्याजमुक्त ५० वर्षांच्या कर्जामध्ये चालु वित्तीय वर्षासाठीच्या तरतूदीत केंद्र सरकारने वाढ करून ते १५ हजार कोटी इतके केले आहे.  तसेच पुढील वर्षासाठी ही तरतूद एक लाख कोटी करण्यात आली आहे. याचे स्वागत आहे. मात्र हे कर्ज वाटप करतांना केंद्र सरकारने जाचक अटी लावू नयेत अन्यथा राज्याला या वाढीव मर्यादेचा काही लाभ होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

[read_also content=”मुनगंटीवार यांचा भुजबळांना सल्ला, अहो ! थेट राज्यपालांशी फोनवर संपर्क साधून घ्या ना. https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mungantiwars-advice-to-bhujbal-ah-do-not-contact-the-governor-directly-by-phone-nraa-231040.html”]

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये सर्वोच्च जीएसटी वसुली झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचा कोणताही लाभ राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तु व सेवा कर वसुली वाढल्याने राज्यांच्या केंद्रीय करातील हिस्सा वाढवणे आवश्यक होते. तसेच वस्तु व सेवा कर नुकसान भरपाईची पाच वर्षाची मुदत आणखी ३ वर्षांनी वाढवून देण्याची राज्य शासनाची मागणी होती. त्यावरही हा अर्थसंकल्प मौन बाळगतो. वस्तु आणि सेवा कराच्या नुकसानभरपाईची राज्यांची मोठी थकबाकी केंद्राकडे प्रलंबित आहे. ती आता राज्याला त्वरीत मिळावी अशी अपेक्षा आहे.  आता उत्पन्नाची स्थिती चांगली झाल्याचा दावा करत असतांना केंद्रीय योजनांमधील कमी होत असलेली केंद्र शासनाची भागीदारी वाढवली जावी, ही मागणीही राज्याने केली होती.

आयकर सवलतीत कोणताही बदल न केल्याने नोकरदार वर्ग नाराज आहे आणि ते स्वाभाविक आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे व वाढत्या महागाईमुळे कौटुंबिक खर्चाबरोबर आरोग्य खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाची आयकर मर्यादा वाढवून मिळणे आवश्यक होते. फाईव्ह जी सेवेची सुरुवात होणार असल्याचे सांगतांना अर्थमंत्र्यांनी  ई शिक्षणासाठीच्या अनेक तरतूदी यात मांडल्या. त्या स्वागतार्ह आहेत, परंतू इंटरनेट सुविधा, त्यांची गती ही आज ४ जीच्या काळातही ग्रामीण विद्यार्थ्यांना पाहिजे तशी अनुभवता येत नसल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ मोबाईल स्वस्त करून चालणार नाही तर इंटरनेट सुविधेचा दर कमी करणे, या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे  गावपातळीवर सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

[read_also content=”जाणून घ्या ई-पासपोर्टबाबत महत्वाच्या बाबी https://www.navarashtra.com/state/what-is-e-passport-few-things-you-need-to-know-nrps-231031.html”]

Web Title: Cm udhhav thackaray reaction on budget nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2022 | 07:13 PM

Topics:  

  • Budget latest news
  • Udhhav Thackaray

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

मला माझा नवरा परत द्या; गायब पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या पत्नीची विनंती

Dec 08, 2025 | 12:30 AM
Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

Dec 07, 2025 | 11:47 PM
भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

Dec 07, 2025 | 11:23 PM
Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Dec 07, 2025 | 10:15 PM
IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

Dec 07, 2025 | 10:03 PM
Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी

Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी

Dec 07, 2025 | 09:55 PM
भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

Dec 07, 2025 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.