फोटो सौजन्य- iStock, X
भारतातील सर्वात मुख्य दस्ताऐवजापैकी पॅन कार्ड आहे. तुम्ही केलेले आर्थिक व्यवहार या पॅनकार्डच्या आधारे सरकारकडे नोदंणीकृत होतात. पॅन कार्ड हे प्रौढांसाठीच काढणे गरजेचे आहे. पण लहान मुलांसाठी काही खास कामांकरिता पॅन कार्ड काढता येऊ शकते. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 160 नुसार पॅन कार्ड काढण्यासाठीची वर्यामर्यादा नसते. त्यामुळे लहान मुलांच्यासाठी पॅन कार्डकरिता अर्ज करता येतो. लहान मुलांच्या आई वडीलांनी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
पॅनकार्डची गरज
ज्यावेळी मुलांच्या नावाने त्याचे आईवडील मुलांच्या नावाने गुंतवणूक करत असतील किंवा ज्यावेळी गुंतवणूकीकरिता लहान मुलांना नॉमिनी म्हणून ठेवले असेल तर त्यावेळी लहान मुलांसाठी पॅन कार्डची गरज पडते. मुलांचे बॅंकेत अकाऊट सुरु करण्यासाठी किंवा सुकन्या समृध्दी योजनेचे खाते सुरु करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता लागू शकते. एखादा अल्पवयीन ITR (Income Tax Return) फाईल करतो त्यावेळी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
पॅनकार्डसाठीचा अर्ज
अल्पवयीन किंवा लहान मुले स्वत:हून पॅन कार्ड बनवू शकत नाहीत. त्याचे आई वडील त्यांच्याकरिता अर्ज दाखल करु शकतात. आज तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज दाखल करु शकतात.
अर्जासंबंधी प्रक्रिया
ऑफलाईन अर्ज
NSDL च्या वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर लहान मुलाची वैयक्तिक माहिती भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तुमच्या परिसरातील NSDL कार्यालयात जमा करा. पडताळणीनंतर तुम्हाला पॅन कार्ड प्राप्त होईल.
आवश्यक कागदपत्रे- आई वडीलांचे आणि लहान मुलाचे ओळखपत्र आणि पत्त्यासाठीचे कागदपत्रे
लहान मुलांना प्राप्त झालेले पॅन कार्ड वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर अपडेट करावे लागते.






