'शेतकरी आणि मच्छीमारांसाठी ३० ट्रिलियन डॉलर्स...', भारत-अमेरिका व्यापार करार फ्रेमवर्क जारी, जाणून घ्या काय म्हणाले पियुष गोयल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India-US interim trade agreement February 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांत आज एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी अधिकृतपणे जाहीर केले की, दोन्ही देशांनी ‘अंतरिम व्यापार कराराची चौकट’ (Interim Trade Agreement Framework) अंतिम केली आहे. हा करार म्हणजे केवळ व्यापार नाही, तर भारतीय तरुण, शेतकरी आणि सूक्ष्म-लघु उद्योगांसाठी (MSMEs) जागतिक श्रीमंतीची गुरुकिल्ली ठरणार आहे.
पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारामुळे भारतीय निर्यातदारांना अमेरिकेच्या ३० ट्रिलियन डॉलर्सच्या अवाढव्य बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल. विशेषतः कापड (Textiles), चामड्याच्या वस्तू, पादत्राणे, हस्तकला (Handicrafts) आणि दागिने या क्षेत्रातील उत्पादनांसाठी अमेरिकेने त्यांचे आयात शुल्क २५% ते ५०% वरून कमी करून केवळ १८% वर आणले आहे. यामुळे भारतीय उत्पादने जागतिक बाजारपेठेत स्वस्त आणि स्पर्धात्मक होतील, परिणामी देशात लाखो नवीन रोजगार निर्माण होतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार
या कराराबाबत सर्वात मोठी चिंतेची बाब कृषी क्षेत्राची होती. मात्र, गोयल यांनी स्पष्ट केले की, भारताने आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केलेली नाही. मका, गहू, तांदूळ, सोया, दूध, चीज आणि मांस यांसारख्या ‘सेन्सेटिव्ह’ कृषी उत्पादनांना या करारातून वगळून पूर्णपणे सुरक्षित ठेवले आहे. दुसरीकडे, भारतीय मच्छीमारांसाठी अमेरिकन बाजारपेठ खुली झाल्याने मत्स्योत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Under the decisive leadership of PM @NarendraModi ji, India has reached a framework for an Interim Agreement with the US. This will open a $30 trillion market for Indian exporters, especially MSMEs, farmers and fishermen. The increase in exports will create lakhs of new job… pic.twitter.com/xYSjxML6kt — Piyush Goyal (@PiyushGoyal) February 7, 2026
credit – social media and Twitter
या कराराच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महत्त्वपूर्ण कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर जो २५% अतिरिक्त दंड (Penalty Tariff) लादला होता, तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकन बाजारपेठेत पुन्हा एकदा समान संधी मिळणार आहे. त्याबदल्यात, भारत पुढील ५ वर्षांत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलर्स किमतीची ऊर्जा उत्पादने, विमाने आणि तंत्रज्ञान खरेदी करणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War Alert: ‘इराण ताबडतोब सोडा’, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना ‘Exit’चा इशारा; ट्रम्पच्या युद्धनौका तेहरानच्या दिशेने रवाना
जेनेरिक औषधे (Pharmaceuticals), हिरे-रत्ने आणि विमानाचे सुटे भाग यांवरील आयात शुल्क आता ‘शून्य’ केले जाणार आहे. यामुळे भारताच्या औषध निर्माण क्षेत्राला मोठी गती मिळेल आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतंर्गत भारतातून होणारी निर्यात नव्या उंचीवर पोहोचेल. मार्च २०२६ पर्यंत या करारावर अधिकृत स्वाक्षरी होण्याची शक्यता असून, त्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल.
Ans: अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क १८% पर्यंत कमी केले आहे आणि काही वस्तूंवर (औषधे, हिरे) ते शून्य केले आहे, ज्यामुळे भारताची निर्यात स्वस्त होऊन वाढेल.
Ans: नाही. पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे की मका, गहू, तांदूळ, दूध आणि पोल्ट्री उत्पादनांना या करारातून संरक्षण देऊन सुरक्षित ठेवले आहे.
Ans: अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जिचा आकार ३० ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. आता भारतीय उद्योजकांना या मोठ्या बाजारपेठेत कर सवलतींसह व्यापार करणे सोपे जाईल.






