'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!
केंद्र सरकार सत्तेत आल्यानंतर लवकरच यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार, असे आडाखे बांधले जात होते. अशातच केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी (ता.६) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. अशातच आता देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एका आघाडीच्या हिंदी वृत्तसमूहाने याबाबत वृत्त दिले आहे.
काय आहे ‘ही’ योजना?
सध्याच्या घडीला पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. प्रामुख्याने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपये, तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये खात्यावर जमा केली जाते. त्यातच आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीच्या हप्त्याच्या रकमेत वाढ केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अर्थसंकल्पात घोषणा होणार
आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6,000 रुपये वार्षिक हप्त्यात वाढ करून, ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. याबाबतचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबा अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने हप्ता वाढणार की नाही? हे जाणून घेण्यासाठी अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे. अशी माहितीही संबंधित हिंदी वृत्तसमूहाने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात दिली आहे.
शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
परिणामी, आता केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. या दरम्यान शेतीसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जातील. त्यातीलच ही एक महत्वाची घोषणा असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास, देशभरातील पात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.