Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण
मागील काही दिवसांमध्ये उद्योगपती गौतम अदानी हे अमेरिकेत झालेल्या कथित हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमुळे वादात सापडले होते. मात्र, असे असतानाही त्यांचे लक्ष अदानी समुहाच्या व्यवसायाचा विस्तार करण्यावरच राहिले आहे. आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अदानी समूहाने एक मोठी डील केली आहे. या अंतर्गत अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने एअर वर्क्स इंडियामधील बहुतांश भागभांडवल खरेदी केले आहे.
400 कोटींना झालीये डील
गौतम अदानी यांनी घेतलेली एअर वर्क्स कंपनी ही भारतातील आघाडीची खासगी विमान देखभाल कंपनी आहे. हे संपादन अदानी ग्रुपच्या कंपनी अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) द्वारे केले गेले आहे. या कंपनीची एंट्री विमान देखभाल आणि ओव्हरहॉल (MRO) उद्योगात अदानीची एंट्री झाली आहे. अदानी समूहाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा संपूर्ण करार 400 कोटी रुपयांमध्ये झाला आहे.
‘या’ आयपीओद्वारे गुंतवणूकदार मालामाल, झालीये जोरदार लिस्टींग; वाचा… कितीये शेअरची किंमत?
कंपनीतील 85 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा विकत घेतला
400 कोटी रुपयांच्या या डीलद्वारे, अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने एअर वर्क्समधील 85.8 टक्के भागभांडवल खरेदी केले करत, या करारावर स्वाक्षरी केली आहे. या संदर्भात अदानी समूहाकडून निवेदन जारी करून माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ADSTL ने देशातील सर्वात मोठी खाजगी MRO कंपनी Air Works मध्ये बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी करार केला आहे.
कंपनी मोठ्या विमान कंपन्यांना पुरवते सेवा
एअर वर्क्स इंडियाची स्थापना 1951 मध्ये झाली. ती देशातील आघाडीच्या विमान कंपन्यांना सेवा पुरवते. या कंपनीच्या ग्राहक यादीत इंडिगो आणि विस्तारा सारख्या नावांचा समावेश आहे. याशिवाय लुफ्थांसा, तुर्की एअरलाइन्स आणि इतिहाद सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्याही यातून सेवा घेतात. यासोबतच एअर वर्क्स भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या विमानांचीही काळजी घेते.
अदानींची एकूण संपत्ती किती
एकेकाळी जगातील टॉप-3 श्रीमंतांपैकी गौतम अदानी यांच्या शेअर बाजारात 10 कंपन्या सूचिबद्ध आहेत. त्यांचा व्यवसाय घरच्या स्वयंपाकघरापासून ते विमानतळापर्यंत विस्तारलेला आहे. जर आपण मालमत्तेबद्दल बोललो, तर ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार अदानीची एकूण संपत्ती (गौतम अदानी नेट वर्थ) 75 अब्ज डॉलर्स आहे आणि या आकडेवारीसह, ते जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत 19 व्या स्थानावर आहे. गेल्या २४ तासांत त्यांची संपत्ती २४९ दशलक्ष डॉलरने वाढली आहे.