मुंबई: कधीकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेले गौतम अदानी (Gautam Adani) आता टॉप 20 (Top 20) तूनही बाहेर फेकले गेले आहेत. अमेरिकन फर्म हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) अदानी यांच्या एकूण संपत्तीत झपाट्यानं घट होताना दिसतेय. गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीतही मोठी घसरण झालेली आहे. दररोज अदानी अब्जावधी रुपयांची संपत्ती गमावत आहेत. सातत्यानं शेअर्सचे भाव घसरत चालल्यानं आता अदानी जगातील श्रीमतांच्या यादीत 29 व्या क्रमांकावर पोहचलेले आहेत. संपत्ती गमावण्याच्या क्रमवारीत गौतम अदानी सध्या जगात पहिल्या क्रमांकावर आहेत.
[read_also content=”काँग्रेस नेते पवन खेरा यांना आसाम पोलिसांकडून अटक, दिल्ली विमानतळावर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन https://www.navarashtra.com/india/congress-leader-pawan-khera-arrested-by-assam-police-on-delhi-airport-nrsr-371749.html”]
अंबानी यांची नेटवर्थ अदानींच्या दुप्पट
एक वेळ अशी होती की जगातील श्रीमतांच्या यादीत अदानी पहिल्या क्रमाकांवर पोहचण्यासाठी अवघ्या काही पावलांवर होते. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्गच्या आलेल्या रिपोर्टनंतर अदानी साम्राज्यावर वीजच कडाडली. दरदिवशी अब्जावधी रुपयांची कमाई करणारे अदानी या एका झटक्यानं खाली खेचले गेले. सुरुवातीला ते जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. त्यानंतर टॉप 20 तून बाहेर पडले. आता ते 30 व्या स्थानी पोहचण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. या सगळ्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीच्या मुकेश अंबानी यांच्याही संपत्ती घट झाली आहे, मात्र तरीही ते जगातील टॉप 20च्या यादीत अद्यापही त्यांचे स्थान राखून आहेत. सद्यस्थितीला मुकेश अंबानी यांची नेटवर्थ ही गौतम अदानी यांच्या दुप्पट आहे.
अंबानींच्या तुलनेत 14 पट गमावली संपत्ती
गौतम अदानी आणि अंबानी यांची तुलना केली तर अदानी यांनी अंबानींच्या 14 पट संपत्ती गमावली आहे. 2023 हे वर्ष या दोघांसाठीही चांगलं नसल्याचं सुरुवातीच्या काळात तरी दिसतंय. अदानी ग्रुपचे चेअरमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन हे दोघेही यावर्षी संपत्ती गमावण्यात पुढं असल्याचं दिसतंय. मुकेश अंबानी यांचा विचार केला तर त्यांनी 5.65 अब्ज डॉलर्स गमावले आहेत. सध्या त्यांची संपत्ती 81.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तक अदानी यांची संपत्ती सध्या 42.7 अब्ज डॉलर्स इतकीच राहिलेली आहे. सध्या मुकेश अंबानी यांच्याकडे अदानी यांच्यापेक्षा दुप्पट संपत्ती असल्याचं सांगण्यात येतंय. बुधवारीही अ्दानी यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळालीय.