Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतींनी गाठला पुन्हा नवीन उच्चांक, दर पाहून ग्राहक चिंतेत! जाणून घ्या आजचा भाव
भारतात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर काल म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक संपल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीनी मोठा टप्पा पार केला आहे.
एवढंच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. काल सोन्या आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर बाजारातील तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता की, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. आता तज्ज्ञांचा अंदाज खरा होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतात आज 6 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,763 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,866 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,073 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे. भारतात केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 125.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,25,900 रुपये आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे. चेन्नई, बंगळुरु आणि हैद्राबाद या शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,730 रुपये आहे.
दिल्ली, चंदीगड आणि लखनौ या शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,810 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,780 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,850 रुपये आहे. मुंबईत आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 125.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,25,900 रुपये आहे.
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
बंगळुरु | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
पुणे | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
मुंबई | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
केरळ | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
कोलकाता | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
नागपूर | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
हैद्राबाद | ₹98,660 | ₹1,07,630 | ₹80,730 |
दिल्ली | ₹98,810 | ₹1,07,780 | ₹80,850 |
चेन्नई | ₹98,810 | ₹1,07,780 | ₹80,850 |
लखनौ | ₹98,810 | ₹1,07,780 | ₹80,850 |
जयपूर | ₹98,810 | ₹1,07,780 | ₹80,850 |
नाशिक | ₹98,690 | ₹1,07,660 | ₹80,760 |
सुरत | ₹98,710 | ₹1,07,680 | ₹80,770 |