मुंबई बनले सर्वात जास्त अब्धाधीशांचे शहर, चीनची राजधानी बीजिंगलाही टाकले मागे!
आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई बाबतीत एक मोठी बातमी आहे. मुंबई शहराने मोठी कामगिरी केली आहे. मुंबई हे आता जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असलेले शहर बनले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या अहवालानुसार मुंबईने आता चीनची राजधानी बीजिंगलाही देखील मागे टाकले आहे. यापूर्वी बीजिंग हे जगातील सर्वात जास्त अब्धाधीश असणाऱ्यांचे शहर होते. आता मुंबईने बीजिंगला मागे टाकत हा मान पटकावला आहे.
बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जवळपास 28 टक्क्यांची घट झाली आहे. मागील एका वर्षात मुंबईतील श्रीमंतामध्ये 58 नव्या अब्जाधिशांची भर पडली आहे. यामुळे शहराची एकूण संपत्ती ही 47 टक्क्यांनी वाढली आहे. अलिकडच्या काळात मुंबईत अब्जाधिश असणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई जगातील सर्वात जास्त अब्जाधीश असणाऱ्या लोकांचे शहर बनले आहे. यामुळे आता मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, मुंबईचा जगात नावलौकीक झाला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
भारतात सर्वात जास्त अब्जाधीश असणारी 10 शहरे कोणती?
मुंबई – 365
नवी दिल्ली – 217
हैदराबाद – 104
बुंगळुरु – 100
चेन्नई – 82
कोलकाता – 69
अहमदाबाद – 67
पुणे – 53
सुरत – 28
गुरुग्राम – 23
दिग्गज उद्योगपती समुह मुंबईतून पाहतात कारभार
दरम्यान, देशात अनेक उद्योगपती समुह हे मुंबईतून आपला कारभार चालवतात. यामध्ये टाटा, अंबानी, अदानी यांसारख्या सर्वच मोठ्या उदयोग समुहांचा समावेश होतो. विशेष म्हणजे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानी असलेले अंबानी समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे मुंबई वास्तव्यास आहेत. याशिवाय आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी असलेले अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देखील याच मुंबई शहरात राहतात. त्यामुळे आता मुंबई अब्धाधीशांचे शहर बनल्याने, जगभरात मुंबईचा नावलौकीक पाहायला मिळत आहे.