घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरणार, खरेदीदारांना विविध पर्याय उपलब्ध होणार!
भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी मात्र, शत्रु राष्ट्र असलेल्या देशांची नेहमीच चर्चा होत असते. विशेष म्हणजे या दोन देशांमध्ये विविध अंगाने नेहमीच तुलना होत असते. मग ती क्रिकेटची मॅच असो की महागाई असो… सर्वच बाबतीत ही तुलना दिसून येते. आज आपण अशाच एका सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत तुलनात्मक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हांला आज या पोस्टच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रॉपर्टीची तुलनात्मक अभ्यासण्यास मिळणार आहे.
या तीन शहरांमध्ये घराँच्या किंमती गगनाला
सध्याच्या घडीला भारतात प्रामुख्याने राजधानी दिल्ली विशेषत: नोएडा, मुंबई, बंगळुरू या शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. याशिवाय देशातील अन्य भागांमध्ये देखील सामान्यांना घर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही नागरिकांची तर ह्यात जाते मात्र, गरिबीच्या परिस्थितीमुळे ते स्वतच्या हक्काच्या राहू शकत नाही. अनेकांचे भाड्याच्या घरात राहण्यात ह्यात निघून जाते. याच पार्श्वभुमीवर आज आपण भारत आणि पाकिस्तानमधील प्रॉपरटीच्या किंमतींबद्दल जाणून घेणार आहोत…
(फोटो सौजन्य – istock)
आर्थिक राजधानी कराचीमधील दर
सध्या पाकिस्तानची परिस्थिती बिकट असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच त्या ठिकाणी प्रॉपर्टीचे दर हे भारतापेक्षा काहीसे अधिकच असल्याचे पाहायला मिळतात. पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी प्रामुख्याने कराची, इस्लामाबाद आणि लाहोर ही सर्वोत्तम शहरे मानली जातात. कराची या शहराला पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हटले जाते. या ठिकाणी 1 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी नागरिकांना कमीत कमी 50 लाख रुपये ते 6 कोटी रुपये खर्च इतके पैसे हक्काच्या घरासाठी खर्च करावे लागतात.
हक्काच्या घर खरेदीसाठी मोठी कसरत
तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. या ठिकाणी 1 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी 50 लाख ते 4 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय ‘ज्याने लाहोर पाहिला नाही, त्याचा जन्म व्यर्थ गेला’, असे म्हणतात. लाहोरमध्ये 1 बीएचके घर खरेदी करण्यासाठी 60 लाख ते 5 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पाकिस्तानात देखील भारताप्रमाणेच हक्काचे घर खरेदी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.






