फोटो सौजन्य - Social Media
हिमांशू लोहिया आर्डेंट एडवर्ल्ड प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे मालक तसेच संस्थापक आहेत. सध्या त्यांच्या या कंपनीमध्ये ४० लोकं कामं करतात तर कंपनीचा टर्न ओव्हर आता साडे ६ कोटींवर पोहचला आहे. पण सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्यासाठी हिमांशू यांनी केलेले अपार कष्ट! महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून हिमांशूला शिक्षण त्यागावे लागले होते. शिक्षण अर्ध्यात सोडण्याचे कारण त्यांच्या आईला असणारा कर्करोग आणि घरातील आर्थिक अडचणी!
या अडचणींना दूर करण्यासाठी हिमांशू यांनी शिक्षण सोडून रस्त्यावर सिम कार्ड विकणे सुरु केले. विविध मोबाईलच्या दुकानांमध्ये जाऊन तसेच रस्त्यावर स्टॉल मांडून त्यांनी सिम कार्ड विकले. यातून कसा बसा घरातील खर्च निघत होता. म्हणून पुढे त्यांनी शाळेत, शाळांच्या बाहेर तसेच महाविद्यालयाच्या ठिकाणी डिक्शनरी विकण्यास सुरुवात केली.
परिस्थिती आवाक्यात आल्यावर हिमांशू यांनी पुन्हा शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बॅचलर ऑफ Mass Communication अँड Journalism या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना एका बीटीएल (Below The Line) या कंपनीत काम मिळाले. या कामात तगडा अनुभव घेऊन त्यांनी चांगलीच सेविंग केली होती, पण कोविड काळात त्यांना प्रचन्ड नुकसान झाला. या काळात कंपनीकडून अर्धा पगार मिळत असल्याने त्यांनी नोकरीच सोडून टाकली आणि त्यांची दहा लाखांची आयुष्यभराची सेव्हिंग पणाला लावली. त्यांनी त्यांच्या पत्नी सुप्रियाच्या विश्वासावर ही जोखीम उचलली. सुप्रिया एका कोळशाच्या कंपनीत असिस्टंट मॅनेजर होत्या.
हिमांशू यांनी आर्डेंट एडवर्ल्ड प्राइवेट लिमिटेड या जाहिरात करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. फक्त तीन महिन्यात त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ७० लाखांवर येऊन पोहचला. आज त्यांच्या याच कंपनीचा टर्न ओव्हर साडे ६ कोटींच्या घरात पोहचलेला आहे. रस्त्याच्या कडेला सिम कार्ड विकणारा मुलगा आज साडे ६ कोटींचा टर्न ओव्हर असणाऱ्या कंपनीचा मालक आहे, हे तरुणांनी शिकण्यासारखे आहे.