(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मार्च २०२५ मध्ये भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर नऊ महिन्यांनी चहलने सांगितले आहे की तो धनश्रीपासून दूर गेला आहे आणि धनश्री देखील तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. मॅशेबल इंडियाला दिलेल्या अलीकडील मुलाखतीत, युजवेंद्र चहलने धनश्री वर्माशी झालेल्या घटस्फोटाबद्दल चर्चा केली. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यातील हा एक अध्याय होता जो आता संपला आहे. मी तो कठीण काळ आता मागे सोडला आहे. मला तिथेच अडकून राहायचे नाही आहे.”
“मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे” – चहल
युजवेंद्र पुढे म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे, ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. एखाद्याला दुःखी करून कोणाला काय मिळते?” चहलने नंतर घटस्फोटादरम्यान कोर्टात घातलेल्या टी-शर्टबद्दलही सांगितले. त्यावर लिहिले होते “बी युअर ओन शुगर डॅडी.” ते धनश्रीच्या चहलकडून मिळालेल्या पोटगीशी जोडले गेले होते. याबद्दल, चहल म्हणाला, “आम्ही कोर्टातून बाहेर पडताच ते तिथेच सगळे संपले.” असे त्याने म्हटले.
घटस्फोटादरम्यान युजवेंद्र चहल नैराश्यात होता
परंतु, धनश्रीशी घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहलने तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे उघड केले. तो म्हणाला, “जेव्हा मी घटस्फोटाच्या काळातून जात होतो तेव्हा माझे मन काम करत नव्हते. म्हणूनच गेल्या वर्षी मी काही मोठ्या क्रिकेट स्पर्धा चुकवल्या. मी हे माझे हरियाणामधील मार्गदर्शक अनिरुद्ध सर यांच्याशी शेअर करायचो. त्या अडचणीवर मात करण्यात त्यांनी मला खूप मदत केली.”
आरजे महवाशसोबत डेटिंगच्या अफवांवर काय म्हणाला?
युजवेंद्र चहलनेही आरजे महवाशसोबत डेटिंगच्या अफवांवरही आपली प्रतिक्रिया दिली. त्याने खुलासा केला की तो अविवाहित आहे. जरी त्याने डेटिंग ॲपवर अकाउंट तयार केले होते, परंतु त्याला ते समजले नाही आणि नंतर त्याने ते डिलिटही केले. आता युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा काहीही संबंध नसल्याचे क्रिकेटरने स्पष्ट केले आहे.






