फोटो सौजन्य - Social Media
होम क्रेडिट इंडिया या अग्रगण्य ग्राहक वित्त कंपनीने ‘अपग्रेड करें लाइफ के सीन्स’ ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम ग्राहकांच्या घरगुती उपकरणांसाठी परवडणारे, लवचिक आणि तंत्रज्ञान-सक्षम आर्थिक पर्याय कसे उपलब्ध करून दिले जातात, यावर प्रकाश टाकते. ही मोहीम यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि लिंक्डइनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या सक्रिय आहे.
उन्हाळ्यातील वाढलेला उकाडा लक्षात घेता, एक एसी, कूलर किंवा फ्रिजसारख्या उपकरणांचा छोटा पण अर्थपूर्ण अपग्रेड कसा आरामदायी आणि जीवनमान सुधारणारा ठरतो, हे मोहीम दाखवते. शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून, घरातील साधे प्रसंग आणि त्यावर उपाय म्हणून सोपा वित्तपुरवठा कसा मदतीचा ठरतो, हे मिश्कील आणि भावनिक शैलीत मांडले गेले आहे. या मोहीमेमुळे हे स्पष्ट होते की उपकरण खरेदी ही केवळ गरज नाही, तर ती एक जीवनशैली सुधारणा आहे. पहिल्या फिल्ममध्ये कूलरसाठी भावंडांमध्ये होणारे भांडण मजेशीर पद्धतीने दाखवले आहे. अखेरीस, वडिलांना होम क्रेडिटच्या सोप्या ईएमआय पर्यायाची माहिती मिळते आणि ते नवीन कूलर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. ही कथा “आप भी नये उपकरण के साथ अपग्रेड करे लाइफ के सीन्स…” या ओळीने संपते.
या संदर्भात बोलताना, होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आशिष तिवारी म्हणाले, “ ‘अपग्रेड करें लाईफ के सीन्स’ ही केवळ एक हंगामी मोहीम नाही – ग्राहकांच्या दैनंदिन आकांक्षा फक्त क्रेडिटनेच नव्हे तर आजच चांगले जगण्याच्या आत्मविश्वासाने सक्षम करण्याच्या आमच्या मुख्य उद्देशाचे हे प्रतिबिंब आहे. #ZindagiHit च्या आमच्या ब्रँड विचारात रुजलेली, ही मोहीम छोट्या अपग्रेडच्या परिवर्तनात्मक शक्तीचा उत्सव साजरा करते – मग ती नवीन कूलरने भावंडांना मिळणारा आराम असो किंवा तरुण व्यावसायिक त्यांचा पहिला एसी खरेदी करत असो किंवा कुटुंबाने चांगल्या रेफ्रिजरेटरमध्ये गुंतवणूक करणे असो. या फक्त खरेदी नाहीत; तर जीवन समृद्ध करणारे आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करणारे टप्पे आहेत.”
गेल्या तीन वर्षांपासून, होम क्रेडिट इंडिया #ZindagiHit अंतर्गत अशा अनेक कथा मांडत आहे. शून्य कागदपत्रे, जलद मंजुरी आणि लवचिक हप्त्यांसह ग्राहकांना त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी सक्षम बनवणे हेच या मोहिमेचे ध्येय आहे.