आता Home Loan घेणे होणार स्वस्त, 'या' सरकारी बँकेने व्याजदरात केली कपात (फोटो सौजन्य-X)
Home Loan News Marathi : घराचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून होम लोनची मोठी मदत होते. मात्र होम लोन घेण्याची प्रोसेस थोडी किचकट असतं. याचदरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्याजदरात कपात केल्यानंतर एका सरकारी बँकेने व्याजदरात कपात केली आहे. ज्यामुळे आता तुम्हाला या बँकेकडून गृहकर्ज घेणे स्वस्त होईल. ती कोणती बँक आहे आणि तिने व्याजदर किती कमी केला, ते जाणून घ्या…
आरबीआयने व्याजदरात ०.२५ टक्के कपात केल्यानंतर आता बँकांनीही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन ओव्हरसीज बँकेने रेपो रेटशी जोडलेले व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहे. यावेळी बँकेने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. बँकेच्या या निर्णयानंतर तुम्हाला स्वस्त दरात गृहकर्ज मिळेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) अलिकडच्या बैठकीत पॉलिसी रेट रेपो 6.25 टक्क्यांवरून सहा टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता इंडियन ओव्हरसीज बँकेनेही व्याजदर कमी केला आहे. व्याजदरात कपात झाल्यामुळे, गृहकर्जासह या बँकेकडून घेतलेल्या सर्व कर्जांचा ईएमआय कमी होईल.
बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर आता या बँकेकडून गृहकर्ज स्वस्त होणार आहे. जर कोणी या सरकारी बँकेकडून कर्जासाठी अर्ज केला तर त्याला कमी ईएमआय भरावा लागेल. गृहकर्जाव्यतिरिक्त, इतर कर्जे देखील आता स्वस्त होतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतीय वस्तूंच्या आयातीवर २६ टक्के शुल्क जाहीर केल्यानंतर वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आरबीआयने व्याजदराचा निर्णय घेतला होता.
इंडियन ओव्हरसीज बँक ही एक सरकारी बँक आहे, बँकेने रेपो लिंक्ड कर्जांवरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ९.१० टक्क्यांवरून ८.८५ टक्के केला आहे. ही कपात १२ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. म्हणजेच आजपासून बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लोकांचा ईएमआय कमी होईल. त्यांना व्याज म्हणून कमी रक्कम द्यावी लागेल.