एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात (photo-social media)
2028 पर्यंत अमेरिकन संगणक कंपनी एचपी इंक. ने 4,000 ते 6000 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने एआय प्रणालींचा वापरामुळे काम जलद आणि सुधारित होत असल्याचे मुख्य कारण दिले आहे. एचपी कंपनीच्या नोकरदार वर्गाच्या १० टक्के आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचपी आता पूर्णपणे स्वत:ला एआय-बेस्ड करून घेण्याच्या तयारीत आहे. या नोकर कपातीमुळे तीन वर्षांत तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 8,3000 कोटी रुपयांची बचत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
हेही वाचा : भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market
या कॉस्ट-कटिंगमागचे कंपनीचा खर्च कमी करणे, कामकाज जलद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गती देणे हा प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले. ग्राहकांना समाधान मिळाल्याने कंपनीची एकूण उत्पादकता वाढेल.
एचपी च्या विकल्या जाणाऱ्या 30 टक्क्यांहून अधिक नवीन संगणक एआय-सक्षम असल्याने ग्राहकांची पसंती मिळाली आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत $14.64 अब्जचे उत्पन्न कमावले. तर ते अधिक होते. परंतु या बातमीनंतर एचपीचे शेअर्स 5.5% मध्ये घसरण झाली.
हेही वाचा : Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?
एचपीची भारतात सुद्धा अनेक ठिकाणी केंद्रे आहेत. बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नोएडा व इतर ठिकाणी भारतीय हजारो लोक काम करत असल्याने कंपनीच्या या निर्णयामुळे कामगार वर्ग चिंतेत आहे. अमेरिकेमध्ये घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम भारतात नोकरी करणाऱ्यांवरही होण्याची शक्यता आहे. मात्र, या एआय नवीन नोकऱ्या सुद्धा निर्माण होणार असून एआय अभियंते, डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग तज्ञांचे पगार 15-20 लाख रुपयांपासून ते 50-60 लाख रुपयांपर्यंत असू शकतात. एचपीच्या या निर्णयामुळे पुढे बाजारपेठत के उलथापालथ होते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






