भारत-न्यूझीलंडने FTAची केली घोषणा; २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, ट्रम्प यांना धक्का ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-New Zealand Free Trade Agreement 2025 : जागतिक राजकारणात आणि व्यापार क्षेत्रात (Trade Agreement) आज भारताने एक मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधत भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, ज्या करारासाठी अनेकदा वर्षे उलटतात, तो करार भारताने अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून जगाला आपली राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे.
या करारांतर्गत न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या ९५% उत्पादनांवरील सीमाशुल्क (Tariffs) एकतर पूर्णपणे रद्द केले जाईल किंवा लक्षणीयरीत्या कमी केले जाईल. यामुळे भारतीय ग्राहकांना न्यूझीलंडची दर्जेदार उत्पादने स्वस्त मिळतील, तर दुसरीकडे भारताच्या आयटी (IT), औषधनिर्माण (Pharmaceuticals) आणि कापड (Textiles) क्षेत्रातील उद्योजकांना न्यूझीलंडची बाजारपेठ खुली होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: गुप्तचर यंत्रणा हाय-अलर्टवर; कट्टरपंथीयांनी ‘रोहिंग्या’ अस्त्र उगारून भारताला अस्थिर करण्याचा रचला कट
या कराराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूक. न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची वचनबद्धता व्यक्त केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी-तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये केली जाईल. याशिवाय, भारतीय तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंडने आपल्या व्हिसा नियमात शिथिलता दिली असून, STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मधील पदवीधरांना ३ ते ४ वर्षांचा पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा दिला जाणार आहे.
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लादण्याची घोषणा केल्यामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली होती. अशा वेळी भारताने न्यूझीलंड, ओमान आणि ब्रिटन यांसारख्या देशांशी व्यापार करार करून आपली अर्थव्यवस्था सुरक्षित केली आहे. भारताने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यायी बाजारपेठा शोधण्यासाठी हा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल
या करारामुळे भारताच्या कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी न्यूझीलंडचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (Centres of Excellence) मदत करतील. सफरचंद, कीवी आणि मधाच्या उत्पादनात भारतीय शेतकऱ्यांना न्यूझीलंडचे तंत्रज्ञान मिळेल. त्याच वेळी, भारतीय औषधे आणि अभियांत्रिकी वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य सीमाशुल्कासह प्रवेश मिळेल, ज्यामुळे देशाच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल.
Ans: यामुळे न्यूझीलंडमधील दर्जेदार फळे (कीवी, सफरचंद) आणि दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होतील, तसेच तंत्रज्ञान देवाणघेवाणीमुळे भारतात नवीन रोजगार निर्माण होतील.
Ans: या करारानुसार, STEM पदवीधरांना ३ वर्षे आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ वर्षांपर्यंतचा पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा न्यूझीलंडमध्ये मिळेल.
Ans: जागतिक व्यापार युद्ध आणि अमेरिकेच्या वाढीव सीमाशुल्कापासून भारतीय निर्यातदारांचे रक्षण करण्यासाठी भारताने हा करार 'फास्ट ट्रॅक' मोडवर पूर्ण केला आहे.






